MP Supriya Sule | संपूर्ण पवार कुटुंब सुप्रिया सुळेंच्या बाजूने, म्हणाल्या ”हे सगळे बहिणीसाठी….”

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – MP Supriya Sule | माझी ही चौथी निवडणूक आहे. माझे सहकारी, कार्यकर्ते हे माझे कुटुंब आहे. माझ्या कुटुंबातील लोक हे माझा प्रचार करतात. तसेच पवार कुटुंबातील माझे सगळे भाऊ, वहिनी माझ्या घरातील मुले, राजूदादा, वहिनी हे सगळे माझ्यासाठी म्हणजेच बहिणीसाठी उभे राहतात. त्याचा मला आनंद आहे. त्यांचाही आधार मला वाटतो, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी संपूर्ण पवार कुटुंब त्यांच्या पाठीशी असल्याचे सूचित केले आहे. (MP Supriya Sule)

बारामती मतदार संघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होण्याची शक्यता आहे. घरातील ज्येष्ठ शरद पवार यांना बाजूला करून सत्ताधारी भाजपाकडे गेलेले अजित पवार यांच्याकडे पवार कुटुंबाने पाठ फिरवल्याचे दिसत आहे. आता खासदार सुळे यांच्या या वक्तव्यानंतर पवार कुटुंब हे शरद पवारांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, काल भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जळगाव येथे बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेला खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मागील ५५ वर्षे महाराष्ट्रात कुणीही नेता आला तर तो शरद पवारांना नावे ठेवतोच. कारण त्याशिवाय हेडलाईनच होत नाही. त्यामुळे अमित शाह आले होते त्यांनी शरद पवारांवर टीका केली नाही तर हेडलाईन होत नाही.

त्या पुढे म्हणाल्या, सध्या आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत.
ज्याला प्रचार करायची इच्छा असेल त्यांनी प्रचार करावा. निवडणूक विचारांनी लढली जाते.
आमच्यावर टीका झाली तरीही मला बरे वाटले की आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही.
जी टीका अमित शाह यांनी केली तो त्यांचा हक्क आहे, असे सुळे म्हणाल्या. तसेच त्यांनी ३ तारखेला
देवेंद्र फडणवीसांशी भेट झाल्याच्या वृत्तात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Mundhwa Police | मुंढवा पोलिसांकडून नियमभंग करणार्‍या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई

Amit Shah On Sharad Pawar | अमित शहांचे टीकास्त्र, अवघा महाराष्ट्र ५० वर्षापासून शरद पवारांचं ओझं वाहतोय, त्या…

Pune Police ACP-Inspector Transfers | पुणे पोलिस आयुक्तायातील 26 अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या, नियुक्त्या ! 3 ACP सह 11 पोलिस निरीक्षकांचा समावेश

Lok Sabha Elections 2024 | अमित शहांची सायंकाळी संभाजीनगरमध्ये सभा, महाराष्ट्र दौऱ्यात सभा-बैठकांचा धडाका, जागावाटपाचा प्रश्न सोडवणार