Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नवीन उपक्रम, गरीब रुग्णांच्या खासगी, धर्मादाय रुग्णालयातील उपचारावर आता सरकारचे लक्ष

मुंबई : Devendra Fadnavis | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्य सरकारने एक महत्वाचा वैद्यकीय उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये गरीब रुग्णांना राज्यातील खासगी तसेच धर्मदाय रुग्णालयात १० टक्के आरक्षित खाटा उपलब्ध होणार आहेत. यासाठी तातडीने मंत्रालयातील मुख्य इमारतीच्या ५ व्या मजल्यावर विशेष वैद्यकीय मदत कक्ष देखील सुरू केला आहे. या कक्षाचे प्रमुख म्हणून आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांची नेमणूक केली आहे.(Devendra Fadnavis)

सर्व खासगी, तसेच धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्या एकूण खाटांपैकी १० टक्के खाटा गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी व १० टक्के खाटा दुर्बल घटकातील रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार करण्यासाठी राखून ठेवणे बंधनकारक आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी संबंधित रुग्णाकडे आधार कार्ड, शिधापत्रिका, तहसीलदारकडून उत्पन्न दाखला, डॉक्टरांकडून खर्चाचा तपशील, तसेच औषधाची चिठ्ठी आवश्यक असते.

मात्र, गरीब व दुर्बल घटकातील रूग्णांना ही सुविधा दिली जात नसल्याच्या अनेक तक्रारी सातत्याने येत आहेत.
ही रुग्णालये धर्मादाय स्वरूपाची असल्याने त्यांना सरकारच्या अनेक सवलतींचा फायदा मिळतो.

तरी देखील ही रूग्णालये गरीबांसाठी आरक्षित खाटा पारदर्शकपणे उपलब्ध करून देत नसल्याने त्याचा फायदा
सरकारला अपेक्षित असलेल्या गरीब रुग्णांना होत नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी, अचूक माहिती मिळवण्यासाठी
देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा स्वतंत्र कक्ष उभारला आहे. खासगी, धर्मादाय रूग्णालये गरीबांसाठी आरक्षित
खाटा उपलब्ध करून देत नसल्याने उच्च न्यायालयाने सुद्धा या संदर्भात आदेश दिले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Court News | बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला पुणे न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

CP Amitesh Kumar At Vidyapeeth Chowk | पुणे पोलीस आयक्तांची विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीची पाहणी, आयुक्तांचा रुद्रावतार पाहून अधिकाऱ्यांची उडाली भांबेरी

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : विकसन करारनाम्यातील अटी शर्तींचा भंग, बिल्डर रितेश वासवानी याला अटक