Devendra Fadnavis | बारामतीकर फक्त पेटवायचे काम करतात ! ‘राजकारणातील लुटारूंना पुरून उरणार बापमाणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस’

पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत हे सध्या आक्रमक पद्धतीने विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत (Sadabhau Khot On Devendra Fadnavis). सध्याच्या राजकारणातील लुटारूंना पुरून उरणार बापमाणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस अशा शब्दांमध्ये सदाभाऊ खोत त्यांनी फडणवीसांचे कौतुक करत बारामतीकर फक्त पेटवायचे काम करतात नाव न घेता टोला लगावला आहे. राज्यातील आरक्षणावर देखील सदाभाऊ खोत त्यांनी प्रतिक्रिया दिली असून आरक्षणाची नव्याने मांडणी आवश्यक असल्याचे देखील ते म्हणाले आहेत. सध्या पंढरपूरमध्ये रयत क्रांती संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी अनेक राजकीय विषयांवर टीप्पणी केली आहे. (Devendra Fadnavis)

विरोधकांवर हल्लाबोल करत सदाभाऊ खोत म्हणाले की, “महाराष्ट्राच्या जनतेला लुटारूंचे राज्य नको असल्याने राज्यातील कष्टकरी जनता महायुतीच्या मागे उभी राहील आणि येत्या लोकसभेत 45 पेक्षा जास्त जागा निवडून देतील. राज्यातील लुटारू राजकारण्यांना पुरून उरणार बापमाणूस देवेंद्र फडणवीस असून त्यांना टार्गेट करण्यासाठी कितीही वेळा त्यांच्या जातीवर बोललं जातं. तरी बहुजनांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम फडणवीस करत आहेत. बारामतीकर फक्त पेटवायचे काम करतात.” असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. (Devendra Fadnavis)

राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून यावर देखील सदाभाऊ खोत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, “मराठा, धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यभर आंदोलने केली जात असताना खऱ्या अर्थाने सर्वच
आरक्षणाची पुर्नमांडणी करावी लागणार आहे. याबाबत राज्यातील विद्वानांनी बोलणे अपेक्षित असताना ते सर्व बिळात
लपून बसले असून याबाबत रयत क्रांती संघटना चार दिवसाचे आरक्षण शिबीर घेऊन यात विद्वानांना मार्गदर्शनासाठी बोलावले जाईल असे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
याआधी देखील आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खोत यांनी शरद पवारांना सुनावले होते. “तुमच्या काळात मराठा समाजाला आरक्षण का दिला नाही? तुमच्या काळात तुम्ही गोट्या खेळाला गेले होते का? की पत्ते खेळायला गेले होते? अशा कडक शब्दांमध्ये माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सवाल विचारला होता.

कार्तिकी यात्रेची महापुजा राज्याच्या दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणी करावी असा सवाल सातत्याने उपस्थित केला जात आहे. यावर सदाभाऊ खोत त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “कार्तिकी यात्रेची महापूजा ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी करावी अशी पुष्टी जोडत आता महामंडळ वाटपात घटक पक्षांना स्थान मिळेल” अशी अपेक्षा सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

API Sarika Jagtap | किशोरवयीन मुलींनी व्यक्त व्हावे – सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका जगताप