Devendra Fadnavis | ‘उद्धवजी आणि माझ्या पत्नीमध्ये एक साम्य आहे..’; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | राज्यात मागील अनेक दिवसांपासून अनेक कारणावरुन सत्ताधारी आणि विरोधकात राजकीय शीतयुद्ध रंगलं आहे. तसेच आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. नुकतंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. तसेच ‘महाउत्सव’ च्या कार्यक्रमात गाण्यावरुन अमृता फडणवीस यांना टोला लगावला होता. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विटरद्वारे पलटवार केला. या पार्श्वूमीवर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

‘उद्धव ठाकरे आणि माझ्या पत्नीमध्ये साम्य असल्याचं,’ देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे. “उद्धव ठाकरे आणि माझ्या पत्नी अमृता यांच्यामध्ये एक साम्य आहे. उद्धवजी टोमणे मारणे सोडत नाहीत आणि माझी पत्नी नको त्या गोष्टींना उत्तर देणं सोडत नाही. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी देखील आपली पातळी वर ठेवली पाहिजे. अशा प्रकारचे काही आल्यानंतर माझं मत आहे की माझा पत्नीने उत्तर देण्याचं कारण नाही. अशा गोष्टी दुर्लक्ष केल्या पाहिजेत. अर्थात हा त्या दोघांचा प्रश्न आहे. त्यामुळे मी यापेक्षा अधिक बोलणार नाही,” असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. “ऐ ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से !” असं ट्वीट त्यांनी केलं होतं. यावर मुख्यमंत्र्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण, महाउत्सवाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘आजपर्यंत मला वाटत होतं की एकाच व्यक्तीला गाता येतं,’ असं म्हणत अमृता फडणवीस यांचं नाव न घेता टोमणा मारला होता. त्यानंतर अमृता फडणवीस यांनीही उत्तर दिलं. “मला सुद्धा धक्का होता, मला वाटलं होतं, अब्जाधीश फक्तं आपणच आहात, आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीशच आहे ! छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा कुटुंबात !,” असा पलटवारही अमृता फडणवीस यांनी केला होता.

 

Web Title :- Devendra Fadnavis | there is a similarity between uddhavji and my wife amruta says devendra fadnavis on their verbal war

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा