Devendra Fadnavis | राज्यातील ‘या’ घटना अत्यंत चिंताजनक, फडणवीसांनी ठाकरे सरकारला केलं ‘सावध’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – त्रिपुरातील हिंसाचाराच्या (Violence in Tripura) घटनेचे पडसाद आज महाराष्ट्रात पहायला मिळाले. राज्यातील अनेक शहरांत मोर्चे काढण्यात आले असून काही ठिकाणी या मोर्चांना हिंसक वळण लागले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या घटनांवर तीव्र चिंता व्यक्त केली असून ठाकरे सरकारचे (Thackeray Government) याकडे लक्ष वेधले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.

 

त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करुन आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेली दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहे. राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.

 

काय आहे प्रकरण?

त्रिपुरातील जातीय हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. त्रिपुरातील घटनांचा निषेध करण्यासाठी मुस्लिम संघटनांकडून (Muslim organizations) देशातील अनेक भागात बंद पाळण्यात येत आहे. आज महाराष्ट्रात अमरावती, मालेगाव, नांदेड, हिंगोली, परभणी या ठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात आले. त्यात अमरावती, मालेगाव नांदेड शहरात मोर्चाला हिंसक वळण लागले. मोर्चेकऱ्यांनी अनेक दुकानांची तोडफोड केली असून पोलिसांनाही काही ठिकाणी लक्ष्य करण्यात आले. यातून तणावाची स्थिती निर्माण झाली असून पोलिसांसमोर कायदा सुव्यवस्था राखण्याचे आव्हान आहे. या मोर्चांकडे बोट दाखवत देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली आहे.

 

Web Title :- Devendra Fadnavis | tripura violence devendra fadnavis expressed concern over the agitation in maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा