Devendra Fadnavis | वेदांता-फॉक्सकॉनच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस निरूत्तर, महत्वाचा प्रश्न असूनही म्हणाले – ‘दररोज तीच कॅसेट वाजवताय’, जरा…

ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे ठाण्यातील टेंभी नका येथील देवीच्या दर्शनासाठी सपत्नीक आले होते. यावेळी त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, वेदांता प्रकल्प (Vedanta-Foxconn Project) गुजरातला गेला. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) यापेक्षा मोठे प्रकल्प महाराष्ट्राला देऊ असे सांगितले होते. त्यासंदर्भातच नवीन मोठे प्रकल्प कशापद्धतीने येणार आहेत? यावर फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, अरे जरा कॅसेट पुढे न्या, तुम्ही दररोज तीच कॅसेट वाजवताय, जरा नवीन नाहीये का? वेदांतासारखा प्रकल्प बाहेर जात असल्याचा विषय निघाल्याने फडणवीस निरुत्तर झाल्याचे दिसून आले.

देवीकडे काय मागितले, असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, महाराष्ट्र चिंतामुक्त कर, ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी आम्हाला शक्ती दे, तुझे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे. तसेच आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि मी जे युतीचे सरकार स्थापन केले आहे त्याच्या माध्यमातून लोकहिताचे काम करण्यासाठी आईकडे शक्ती मागितली, असे फडणवीस म्हणाले. राज्यातील उद्योगधंदे बाहेर जात आहेत, यावर प्रश्न विचारल्यानंतर फडणवीस निरूत्तर झाले आणि त्यांनी उत्तर देणे टाळले.

दसरा मेळाव्याबाबत (Dasra Melava 2022) फडणवीस म्हणाले,
मुंबईत होणार्‍या दसरा मेळाव्यासाठी कायदा सुव्यवस्था चोख ठेवणार आहोत.
राज्यातील विविध भागातून येणार्‍या लोकांपासून काहीच अडचण नसून त्या गर्दीचा फायदा घेऊन कोणी चुकीचे काम करू नये म्हणून आम्ही काळजी घेऊ.

यावेळी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांचे स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे
(Lata Shinde) आणि खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांच्या पत्नी वृषाली यांनी केले.

Web Title :- Devendra Fadnavis | you play the same cassette every day fadnavis also answered the journalists question

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shivsena | देशात ‘5 G’ पेक्षा राजकारणाचे ‘हांजी हांजी’ नेटवर्क गतिमान! शिवसेनेचा मोदी-शिंदेंना टोला

Maharashtra Political Crisis | शिवसेना, विश्वासघात अन् काँग्रेस; तेव्हा वसंतसेना म्हणून शिवसेनेला हिणवले जायचे

Dasara Melava 2022 | दसरा मेळाव्यासाठी मुंबई पोलिसांचा विशेष प्लॅन, ‘या’ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची केली नियुक्ती