Shivsena | देशात ‘5 G’ पेक्षा राजकारणाचे ‘हांजी हांजी’ नेटवर्क गतिमान! शिवसेनेचा मोदी-शिंदेंना टोला

मुंबई : Shivsena | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते देशात 5 जी (5G) सेवेला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील प्रगती मैदानावरील (Pragati Ground, Delhi ) इंडियन मोबाईल काँग्रेसमधून (Indian Mobile Congress) देशभरातील 5 जी सेवेशी जोडलेल्या 30 शाळांसोबत संवाद साधला. यामध्ये महाराष्ट्रातील पनवेलमधील शाळेचा समावेश होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सुद्धा या शाळेत उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिंदे यांनी मोदी सरकारचे (Modi Government) कौतुक केले. यावरून शिवसेनेने (Shivsena) एकीकडे 5 जी सेवेचे स्वागत करतानाच नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात शिंदेंचा उल्लेख मिंधे असा करत म्हटले आहे की, देशात 5 जी आले हे उत्तम, पण 5 जी पेक्षा देशाच्या राजकारणाचे हांजी हांजी नेटवर्क गतिमान झाल्याचे दुष्परिणाम आपला देश भोगत आहे. आम्ही 5 जी चे स्वागत करतो. इंटरनेटचा वेग वाढवून हांजी हांजीचा वेग कमी केला तर 2029 पर्यंत देश जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था नक्कीच बनेल. 5 जी चे पंख या स्वप्नास बळ देतील.

अग्रलेखात म्हटले आहे की, मोदी यांना वेगाचे वेड आहे. ते देशाला गतिमान करू इच्छितात. त्यांनी जपानच्या मदतीने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai-Ahmedabad Bullet Train) सुरू करण्याचे मनावर घेतले व आसपासच्या भागातील जमिनी या प्रकल्पासाठी ताब्यात घेतल्या. म्हणजे या विकासात शेतकरी (Farmer) व जमीनमालकांचेही योगदान आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

शिवसेनेने (Shivsena) म्हटले आहे की, देशात सुरू झालेली 5 जी सेवा विकासात भर घालणारीच आहे, मात्र गेल्या पाच-सहा वर्षांत देशाच्या राजकारणाचे हांजी हांजीकरण 5 जीच्या वेगाने आधीच सुरू झाले व ते पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेस तडा देणारे आहे. घराणेशाही, वंशवादाच्या राजकारणात हांजी हांजी चालते, पण लोकशाहीत 5 जी वर ’हांजी’ने मात करू नये इतकीच अपेक्षा असते.

मोदी यांनी देशात ’5 जी’ युग सुरू केले, पण देशाच्या अनेक भागांत आज इस्पितळे नाहीत.
शिक्षणाची बोंब आहे. महाराष्ट्रात, मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात आदिवासींना ’झोळी’ व ’डोली’च्या
माध्यमांतून आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचवावे लागते.
गरोदर स्त्रिया त्या झोळीतच अनेकदा बाळंत होतात व त्यात अर्भकांचे मृत्यू होतात.
’5 जी’ युगातील हे चित्र विदारक आहे. गरीबांना फुकट धान्य दिले जाते, पण हे काही स्वावलंबी भारताचे चित्र नाही,
असे अग्रलेखात म्हटले आहे.

Web Title :- Shivsena | 5g and hanji hanji shivsena targets modi and taunts chief minister eknath shinde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Dasara Melava 2022 | दसरा मेळाव्यावरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा, म्हणाले-‘कायदा मोडला तर…’ (व्हिडिओ)

Maharashtra Political Crisis | शिवसेना, विश्वासघात अन् काँग्रेस; तेव्हा वसंतसेना म्हणून शिवसेनेला हिणवले जायचे

Pune Crime | कंपनीत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, युनीट सहाची कामगिरी; 12 गुन्हे उघडकीस