Dhairyasheel Mohite Patil | वेळ आली तर तुरुंगात बसेन, पण दबावाला भीक घालणार नाही; धैर्यशील मोहिते पाटलांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Dhairyasheel Mohite Patil | आता गुंडगिरी, झुंडशाही, भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नसल्याचा थेट इशारा दिला होता. तुमच्या टीकेला कृतीतून उत्तर दिले जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अकलूजच्या विजय चौकात (Vijay Chowk Akluj) दोन दिवसांपूर्वी झालेल्या सभेत सांगितले होते. विशेष म्हणजे अकलूज येथे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite-Patil) यांनी रस्त्यात थांबवून गुलाबाचा गुच्छ देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, फडणवीस त्या ठिकाणी न थांबता थेट सभास्थानी गेले होते.

त्यामुळे आता फडणवीस यांनी मोहिते पाटील यांना टार्गेट केल्याचे स्पष्ट झाले होते. मोहिते पाटील यांना काय काय मदत केली, याचा देखील उल्लेख फडणवीस यांनी केला असताना आता थेट कृती केली जाईल, असे स्पष्ट संकेत दिले होते. यानंतर मोहिते पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लागले असताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट फडवणीसांना अंगावर घेत, मी कोणत्या दबावाला भीक घालणार नाही, वेळ पडली तर तुरुंगात जाऊन बसण्याची तयारी केल्याचे सांगत त्यांनी फडणवीसांना आव्हान दिले आहे. करमाळा तालुक्यातील (Karmala Taluka) केम येथे सभेत बोलताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी पहिल्यांदाच या दबावावर उत्तर दिले.

कोणत्याही गोष्टीला भीक घालत नाही

मोहिते पाटील म्हणाले, आजच्या भाषणात तर अजून दबाव आले आहेत, पण मी शंकरराव मोहिते पाटील यांचा नातू आहे,
त्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टीला भीक घालत नाही. हे केवळ तुमच्यासाठी भीक घालणार नाही.
ठरवतानाच मी कुटुंबात माझ्या वडिलांना, आईला आण मंडळीला दोन मुलींना सांगितलं होते की,
इलेक्शन झाल्यानंतर मला अनेक गोष्टींना तोंड द्यायची वेळ येणार आहे आणि माझी काहीही तयारी आहे.
ती फक्त मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी सर्व सामान्यांसाठी मी
काय पण किंमत मोजेल, आत बसण्याची तयारी देखील ठेवली आहे.

घरमालकाला बाहेर काढून घर बळकावण्याचे काम

मोहिते पाटील पुढे म्हणाले, मानसिकता केली आहे आणि मगच निवडणुकीला उतरलो आहे.
ही मनाची तयारी झाल्यावरच निवडणूक लढविण्याचे ठरविले आणि पवार साहेबांना भेटून तुमच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.
आज तुम्ही घरमालकाला सुद्धा बाहेर काढून घर बळकावण्याचे काम करीत आहेत, असे सांगत शरद पवार यांची राष्ट्रवादी
आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना बळकाविल्याचा भाजपला टोला लगावला.
उतारा त्यांचे नावावर, घर त्यांच्या नावावर आणि तुम्ही ते घर त्यांचे नाही म्हणून सांगता, असाही टोला धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपला लगावला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murlidhar Mohol | पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यावर भर : मुरलीधर मोहोळ

Amol Kolhe On Gas Cylinder Price | गॅस सिलिंडरच्या तीनवेळा पाया पडा, मग विचार करून मतदान करा, अमोल कोल्हेंचे मतदारांना आवाहन