Dhananjay Munde Accident | माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात, छातीला मार; सांगितला संपूर्ण घटनाक्रम

बीड: पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA) धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात (Dhananjay Munde Accident) झाला आहे. परळीकडे जात असताना धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात (Dhananjay Munde Accident) झाल्याचे फेसबुक पोस्टमधून त्यांनी सांगितले आहे. तसेच छातीला किरकोळ मार लागला असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केलं आहे.

मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील भेटी आणि कार्यक्रम आटोपून परळीकडं जात असताना हा अपघात झाला. या अपघातात (Dhananjay Munde Accident) ते किरकोळ जखमी झाले असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. हा अपघात कसा झाला याबाबत धनंजय मुंडे यांनी माहिती दिली. दरम्यान, धनंजय मुंडे यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टममध्ये म्हटले की, मंगळावारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम आणि
भेटी आटपून परळीकडे परतताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा
वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे.
माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका.

Web Title :- Dhananjay Munde Accident | dhananjay mundes first reaction after the accident the entire sequence of events is told