Mahavitaran Strike | पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणची बत्ती गुल; अनेक ठिकाणी पहाटेपासून वीज पुरवठा खंडीत

पुणे : Mahavitaran Strike | महावितरणच्या खासगीकरणाविरोधात अधिकारी व कर्मचार्‍यांनी सुरु केलेल्या ७२ तासाच्या संपाचा परिणाम आता जाणवू लागला असून पुणे शहर, सातारा, भंडारा, अहमदनगर, वाशिम येथील अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. कोयना धरणाचा पायथा वीजगृह बंद पडले असून ४० मेगावॅट वीज निर्मिती ठप्प झाली आहे. (Mahavitaran Strike)

पुणे शहरातील शिवणे, धायरी, उत्तमनगर, कोंढवा, कोपरे, सनसिटी भागातील वीजपुरवठा पहाटे ३ वाजल्यापासून खंडीत झाला आहे. हा वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

सातारा जिल्ह्यातही अनेक गावातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे.
कर्मचार्‍यांचा संप सुरु झाल्याने वीज पुरवठा कधी सुरु होईल, याची कोणी सध्या तरी सांगू शकत नाही. (Mahavitaran Strike)

अहमदनगरमधील सावेडी उपनगर भागातील वीज पुरवठा मध्यरात्रीपासून बंद पडला असून त्यामुळे परिसरातील पाणी पुरवठ्यात व्यत्यय आला आहे.

Advt.

भंडारा शहरातील बहुतांश भागासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे.
वाशिम येथील ३ उपकेंद्रे बंद पडली असून त्याचा फटका ४२ गावांना बसला आहे. तेथील वीज खंडीत झाली आहे.

संपावर गेलेले कर्मचार्‍यांनी मुंबईत विशाल मोर्चा काढला असून प्रकाशगड येथे कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरु आहे.

Web Title :- Mahavitaran Strike | Batti Gul of many places in the state including Pune; Electricity supply has been interrupted in many places since morning