हे तर माझे कर्तव्य, विद्यार्थीनीच्या पत्रामुळे धनंजय मुंडे झाले भावुक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते (NCP) आणि राज्याचे समाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे आपल्या खात्यासंदर्भात घेत असलेल्या धडाकेबाज निर्णयामुळे ते कायम चर्चेत असतात. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय असो किंवा वसतीगृहांचा प्रश्न, धनंजय मुंडे यांनी सर्व विषय तात्काळ मार्गी लावले आहेत. आपल्या खात्याचे प्रश्न सोडवत असताना ते विद्यार्थ्यांना देखील मदत करतात. एका विद्यार्थिनीला शिषवृत्तीसाठी केलेल्या मदतीमुळे धनंजय मुंडे यांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

स्नेहा काशीनाथ गोडेशवर या विद्यार्थीनीने धनंजय मुंडे यांना एक पत्र लिहिलं आहे. स्नेहाने 2020-21 या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठासाठी अर्ज केला होता. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे तिचा अर्ज रद्द करण्यात आला होता. त्यानंतर स्नेहाने ऑस्ट्रेलियन नॅशनल विद्यापीठात अर्ज केला होता. अचानक विद्यापीठ बदलण्यात आल्याने तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

यासंदर्भात स्नेहाने धनंजय मुंडे यांच्याकडे विद्यापीठाच्या शिषवृत्तीबद्दल मदत मागितली होती. धनंजय मुंडे यांनी तातडीने यात लक्ष घातले आणि स्नेहाच्या आंतरराष्ट्रीय शिषवृत्तीचा विषय मार्गी लावला . त्यामुळे स्नेहाला ऑस्ट्रेलियात शिक्षण घेण्याचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा झाला आहे.

याबद्दल स्नेहाने धनंजय मुंडे यांना एक पत्र लिहिले आहे. हे पत्र तिने ट्विट केले आहे. धनंजय मुंडे यांनी देखील मोठ्या मनाने स्नेहाचे पत्र रिट्विट केला आहे. पत्र रिट्विट करताना धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की, हे तर माझे कर्तव्य आहे, मी मझ्या सर्व बहिणींच्या पाठीशी आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र.