Dhananjay Munde | शेवटी निवडणूक कोण जिंकणार हे मायबाप जनता ठरवत असते, धनंजय मुंडेंचे पंकजा मुंडे यांना प्रत्युत्तर

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde ) यांचा बीड जिल्ह्यातील भगवान गडावर (Bhagwangad) दसरा मेळावा (Dasara Melava 2022) झाला. मी आता 2024 च्या तयारीला लागली आहे. मला कोणताही गर्व नाही, मी स्वाभिमानी आहे. मी तुम्हाला असत्य कधीही बोलणार नाही. सत्य अस्वस्थ होत पण पराजित होत नाही असे म्हणत 2024 च्या निवडणुकांच्या (Elections) तयारीला लागा असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. यावर राष्ट्रवादीचे आमदार (NCP MLA) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक कोण जिंकणार हे मायबाप जनता ठरवत असेत, असा पलटवार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पंकजा मुंडेंवर केला आहे.

दसऱ्यानिमित्त परंपरेनुसार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सपत्नीक नांदेड येथील माहूर गडावर जाऊन रेणुका मातेचे दर्शन घेतलं आहे.
परळी इथून धनंजय मुंडे हेलिकॉप्टर द्वारे माहूरगडावर पोहोचले, त्यानंतर ते अंबाजोगाई येथे आले होते.
त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले.

धनंजय मुंडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले की, निवडणुकीची तयारी प्रत्येक जण करत असतो,
लोकशाहीत ज्याला त्याला कुठल्या ना कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची संधी मिळत असते.
निवडणूक ही लोकशाहीचा गाभा आहे.
कोणी कुठून निवडणूक लढावी की लढावावी हा ज्याचा त्याचा पक्ष ठरवत असतो.
पक्षाने जबाबदारी दिल्यानंतर ती लढावीच लागेल.
शेवटी निवडणूक कोण जिंकणार हे मायबाप जनता ठरवत असते,
असं प्रत्युत्तर धनंजय मुंडे यांनी पंकजांना दिले आहे.

Web Title :- Dhananjay Munde | In the end it is the people who decide who will win the election, Dhananjay Munde’s reply to Pankaja Munde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | ‘मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नही होंगे, जो…’ दसरा मेळाव्याच्या भाषणापूर्वी एकनाथ शिंदेंचे सूचक ट्विट

Shinde Group | नाशिकमध्ये शिंदे आणि शिवसेनेच्या गटात राडा, महिला शिवसैनिकांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला भर रस्त्यात दिला चोप; छेड काढल्याचा आरोप