Dhananjay Munde | धनंजय मुंडेंचा शैक्षणिक संस्थांना इशारा; म्हणाले – ‘फी न भरल्याने विद्यार्थ्यांची कागदपत्रांसाठी अडवणूक करु नका, अन्यथा…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फि न भरल्याने (Non-Payment of Fees) विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची (Students Document) अडवणूक होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहे. याप्रकरणी आमदार सुनील प्रभू (MLA Sunil Prabhu) यांनी प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी फि न भरल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मूळ कागदपत्रांची अडवणूक करणाऱ्या महाविद्यालयाच्या प्राचार्याविरोधात (College Principal) कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले. आमदार सुनिल प्रभू यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, शैक्षणिक संस्थांना (Educational Institution) फी न भरल्यानं विद्यार्थ्यांचं प्रमाणपत्र रोखता येत नाही. टाटा सामाजिक विज्ञान संस्था Tata Institute of Social Sciences (TISS) कडूनही आडकाठी घालण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

फी न भरल्याने फक्त शाळाच प्रमाणपत्र देत नाहीत तर टाटासारख्या नामांकित शिक्षण संस्थेनंही पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate) दिले नाहीत. टाटा सामाजिक विज्ञान संस्था म्हणजे टीस ने ही 153 विद्यार्थ्यांचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाच्या प्रमाणपत्र (Post Graduate Certificate) दिले नाही. अनुसूचित जाती (Scheduled Castes) आणि जमातीच्या (Scheduled Tribes) विद्यार्थ्यांना फी न भरल्याने प्रमाणपत्र देण्यास टीसने मनाई केली आहे. प्रमाणपत्रच नाही तर इतर कागदपत्रे ही देण्यास टीसने नकार दिला आहे, अशी माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्यांना सरकारने शिष्यवृत्ती (Scholarship) देण्यास विलंब लावल्याने टीसने विद्यार्थ्यांची आडकाठी केली.

याबाबत समाज कल्याण आयुक्त (Social Welfare Commissioner) कार्यालयातील अधिकाऱ्यांनी टीस संस्थेत जाऊन चौकशी केली.
त्यावेळी 78 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यात जमा झाली होती.
परंतु त्यांनी शुल्काची रक्कम संस्थेकडे जमा केली नसल्याने त्यांचे पदवी प्रमाणपत्र दिले नसल्याची माहिती मिळाली होती.
4 मार्च रोजी सरकारने टीसला पत्राद्वारे ही प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहेत.
फी न भरल्याच्या कारणावरुन असं पदवी, पदव्युत्तर प्रमाणपत्र शैक्षणिक संस्थांना रोखता येणार नाही, असे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी लेखी उत्तर दिले.

 

धनंजय मुंडे यांनी लेखी उत्तरात असेही म्हटले आहे की,
विविध महाविद्यालयात शिकत असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या मूळ कागदपत्रांची फी न मिळाल्यानं अडवणूक होत आहे.
तसे होत असेल तर महाविद्यालयाच्या प्राचार्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचनाही मुंडे यांनी दिल्या आहेत.

 

 

Web Title :- Dhananjay Munde | maharashtra budget session 2022 obstacles for documents due to non payment of fees by tiss and other educational institute warning of dhananjay munde in vidhansabha

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा