Dhananjay Munde On Meera Borwankar Book Allegation | धनंजय मुंडेंकडून मोठा आरोप, अजित पवारांच्या बदनामीचा डाव, त्यांना राजकारणातून संपविण्याचे षडयंत्र

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Dhananjay Munde On Meera Borwankar Book Allegation | माजी आयपीएस अधिकारी व पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी येरवड्याच्या पोलिसांच्या जागेबाबत तत्कालीन पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका खासगी विकासकाला देण्यासाठी आग्रह धरल्याचा दावा पुस्तकात केल्याने खळबळ उडाली आहे. यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, अजित पवार समर्थकांमधून प्रथमच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. (Dhananjay Munde On Meera Borwankar Book Allegation)

पुण्यात साखर संकुलात रब्बी हंगामाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. तत्पूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. धनंजय मुंडे म्हणाले, येरवडा येथील जागेसाठी पीपीपी तत्वावर निविदा राज्याच्या तत्कालीन गृहमंत्र्यांच्या आदेशानेच काढण्यात आली. त्यांनीच ती रद्द केली होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निष्कारण आरोप केले जात आहेत. राज्याच्या विकासाची स्वप्न पाहणाऱ्या जनसेवकाला बदनाम करण्याचे व राजकारणातून संपविण्याचे हे षडयंत्र आहे. (Dhananjay Munde On Meera Borwankar Book Allegation)

मुंडे म्हणाले, तत्कालीन गृहमंत्र्यांच्या आदेशानेच ही निविदा काढण्यात आली. त्यावेळी तक्रार करण्याऐवजी निवृत्त झाल्यावर पुस्तकात दावे करून एखाद्याला बदनाम करणे मोठ्या अधिकाऱ्यांना शोभणारे नाही. तत्कालीन गृहमंत्र्यांनीच या जागेची निविदा रद्द केली आहे. तरीही जागा वाचविल्याचे श्रेय घेण्यासाठी अजित पवार यांच्यावर आरोप केले जात आहेत.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव न घेता धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
मुंडे म्हणाले, नेतृत्वाने मुख्यमंत्री व्हावे, असे प्रत्येक कार्यकत्र्याला वाटते. मात्र, राष्ट्रवादीला संधी असताना,
मुख्यमंत्रीपद सोडले. त्यामुळे कार्यकर्त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे होते की नाही, याचे उत्तर आमच्या दैवताकडे आहेका.

दरम्यान, हा अजित पवारांच्या बदनामीचा डाव असून त्यांना राजकारणातून संपविण्याचे षडयंत्र असल्याचे जे
वक्तव्य धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे, त्याचा नेमका रोख कोणाकडे आहे, हे स्पष्ट झालेले नाही.
मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकातून येरवडा जमीन प्रकरणाचा उल्लेख केला आहे.
मग अजित पवारांना राजकारणातून संपवण्याचे षडयंत्र कोणाचे आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील युवकास महापालिकेच्या शहरी गरीब योजनेत सहभागी करण्याासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांवर दादागिरी