Pune PMC News | शहरी गरीब योजनेत सहभागी करण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यतील युवकाची पालिकेच्या अधिकाऱ्यांवर दादागिरी

पोलिसांना पाचारण केल्यावर दिला लेखी माफीनामा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | उस्मानाबाद येथे राहाणार्‍या आई- वडीलांचे महापालिकेच्या शहरी गरीब योजनेत (Shahari Garib Yojana Pune) नाव नोंदवता येणार नाही, असे आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितल्यानंतर अधिकार्‍यांना एकेरीतून बोलत गोंधळ घालणारा बिबवेवाडी येथील युवक पोलिस बोलविल्यावर शांत झाला. विशेष असे की, या युवकाने त्याअगोदर थेट उस्मानाबादचे पालकमंत्री आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या पी.ए.ला देखिल फोन करून अधिकार्‍यांची तक्रारही केली होती. (Pune PMC News )

बिबवेवाडी येथील शिवतेज नगर येथे राहाणार्‍या एका तरुणाकडे महापालिकेचे शहरी गरीब कार्ड आहे. या कार्डवर आई आणि वडीलांचे नाव घेण्यासाठी त्याने महापालिकेकडे ऑनलाईन अर्ज केला होता. त्यांनी अर्जासोबत जोडलेल्या आई वडीलांच्या आधारकार्डवर उस्मानाबाद येथील पत्ता होता. ही योजना फक्त पुण्यातील रहीवासी पुरावा असलेल्या नागरिकांसाठीची आहे, त्यांना या योजनेत सहभागी होता येणार नाही, अशी माहिती महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली. सोमवारी यासंदर्भात माहिती दिल्यानंतरही त्याने आज परत आरोग्य विभागाच्या कार्यालयात येउन कर्मचारी आणि अधिकार्‍यांसोबत वाद घालायला सुरूवात केली. त्याने आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या पी.ए.ला देखिल फोन लावून अधिकार्‍यांकडे दिला. (Pune PMC News)

अधिकार्‍यांनी योजनेबाबत सातत्याने समजावून सांगितल्यानंतरही वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कार्यालयात त्यांचा एकेरी उल्लेख करत गोंधळ घालायला सुरूवात केली. महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी त्याला अडविले. मात्र, त्यांनाही शिवीगाळ केली. अखेर प्रशासनातील अधिकार्‍यांनी पोलिसांनी बोलावून घेतले. पोलिसांनी गुन्हा दाखल करायची तयारी सुरू केल्यावर तो काहीसा नरमला. त्याने अधिकार्‍यांना लेखी माफीनामा दिल्यानंतर प्रशासनाकडूनही पुढील कार्यवाही थांबविण्यात आली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | महापालिका आणि शिक्षणमंडळाकडील अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांना 1 जानेवारीपासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला वेतन आणि पेन्शन मिळणार – रविंद्र बिनवडे

पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची जाहीरात फलक
आणि नाम फलकात गल्लत ! व्यापार्‍यांना दुकानांवरील पाट्यांसाठी पाठविल्या जाहीरात फलक दराने
पैसे भरण्याच्या नोटीसेस