तक्रार मागे घ्या अन्यथा…; धनंजय मुंडेंनी तक्रारदार महिलेच्या कुटुंबाला धमकी दिल्याचा वकिलांचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे( dhananjay munde) यांच्यावर एका गायिकेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. त्यातच मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरुपाचे असून त्यांच्याबद्दल पक्ष योग्य तो निर्णय घेईल, असे खा. शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यावरूनच मुंडे यांना लवकरच राजीनामा द्यावा लागू शकतो अशी चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे आता रेणू शर्मा यांच्या वकिलाने धनंजय मुंडेंवर आरोप केले आहेत.

रेणू शर्मा यांच्या वकिलाने म्हटले आहे की, रेणूच्या भावाला आणि वहिनीला धमकी देण्यात आली आहे. तसेच तुझ्या बहिणीला तक्रार परत घ्यायला लाव, नाहीतर तुझ्या परिवाराला खंडणीच्या गुन्ह्यात आतमध्ये टाकेन. तुम्हा लोकांना माझी पॉवर माहिती नाही अशी धमकी धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आल्याचा असा मोठा आरोप रेणूच्या वकिलांकडून करण्यात आला आहे. प्रकरण समोर येऊन ४ दिवस झाले तरी अजून तरी एफआयआर नोंद दाखल करण्यात आलेला नाही. धनंजय मुंडे हे दबाव टाकत आहेत. रेणू विरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. माझ्या ताकदीची तुम्हाला कल्पना नाही. बहिणीला गुन्हा मागे घ्यायला सांगा. नाहीतर सगळ्या कुटुंबाला खंडणी प्रकरणात अडकवू, अशी धमकी धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दिल्याचंही वकिलांनी सांगितलं आहे.