Dhangar Reservation | गिरीश महाजनांनी पुन्हा करुन दाखवलं, 21 व्या दिवशी चौंडीतील धनगर समाजाचं उपोषण मागे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – धनगर आरक्षणासाठी (Dhangar Reservation) चौंडी येथे 20 दिवसांपासून सुरु असलेले उपोषण 21 व्या दिवशी मागे घेण्यात आले. राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची शिष्टाई यशस्वी ठरली. अहमदगनर मधील चौंडी येथे यशवंत सेनेच्यावतीने (Yashwant Sena) उपोषण सुरु होते. धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीतील आरक्षणाच्या (Dhangar Reservation) अंमलबजावणीसाठी आंदोलन सुरू आहे.

21 व्या दिवशी उपोषणकर्ते सुरेश बंडगर (Suresh Bandgar) आणि आण्णासाहेब रुपनवर (Annasaheb Rupanwar) या दोघांची प्रकृती बिघडली. सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आंदोलकांशी फोनवरुन चर्चा करत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. दरम्यान, आज (मंगळवार) मंत्री गिरीश महाजन हे चौंडीत उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आले होते. त्यानंतर आज उपोषणकर्त्यांनी महाजन यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी सरकारची भूमिका समजून सांगितली. आंदोलकांचे समाधान झाल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले.

यावर गिरीश महाजन म्हणाले, 21 सप्टेंबरला धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत (Dhangar Reservation) सरकार
आणि सर्व धनगर समाजाचे प्रतिनिधी यांची मुंबईत बैठक झाली. राज्य सरकारने (State Government) त्यांच्या
मागणीला न्याय म्हणत एकमताने पाठिंबा दिला. या आरक्षणासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत.
काही गोष्टी न्याय प्रविष्ट आहेत. त्या गोष्टी सोडवण्यासाठी शासन गंभीर आणि कटिबद्ध आहे.

धनगर समाजाची दुसरी मागणी होती की, या आंदोलनाच्या काळात धनगर समाजाच्या बांधवांवर जे गुन्हे दाखल झाले
आहेत ते मागे घ्यावेत. ही मागणी देखील सरकारने मान्य केली आहे. हे गुन्हे मागे घेतले जातील, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime News | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांचा झोन पाचमधील सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा

Vijay Wadettiwar | ‘सत्ता प्राप्तीसाठी खाली केलेले खोके पुन्हा भरण्यासाठी पेपर फुटले’, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर गंभीर आरोप