Dharmaveer 2 Poster Out | बहुप्रतिक्षित ‘धर्मवीर 2’ चित्रपटाची घोषणा; निर्मात्यांनी जेजूरीतील खंडोबाचे दर्शन घेत केले पोस्टर आऊट

पोलीसनामा ऑनलाइन – Dharmaveer 2 Poster Out | मराठी सिनेविश्वातील सुपरहिट ‘धर्मवीर‘ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ठाण्यातील शिवसेनेचा ढाण्या वाघ अर्थात दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट (Dharmaveer: Mukkam Post Thane) प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. चित्रपटांतील आनंद दिघे यांच्या आयुष्यातील अनेक मह्त्त्वपूर्ण घटना या दाखवण्यात आल्या होत्या. चित्रपट आणि त्यातील आनंद दिघे यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांना भावला होता. आता याच धर्मवीर चित्रपटाचा सिक्वेल (Dharamveer movie sequel) ‘धर्मवीर 2’ प्रेक्षकांच्या (Dharmaveer 2) भेटीस येणार आहे. जेजूरीमध्ये चित्रपटाच्या निर्मात्यांकडून व दिग्दर्शकांकडून ‘धर्मवीर 2’ या चित्रपटाचे पोस्टर आऊट (Dharmaveer 2 Poster Out) करत घोषणा करण्यात आली आहे.

‘धर्मवीर’ या चित्रपटामध्ये आनंद दिघे यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak) साकारली होती. अगदी हुबेहुबे अभिनय करत त्याने पडद्यावर आनंद दिघे साकारले होते. 2022 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामुळे आनंद दिघे यांचा प्रवास व राजकीय काराकिर्द सर्वांना समजली. तेव्हापासून प्रेक्षकांना ‘धर्मवीर 2’ चित्रपटाची आतुरता लागली होती. ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची निर्मिती मंगेश देसाई (Mangesh Desai) यांनी केली होती तर चित्रपटाचे दिग्दर्शन प्रविण तरडे (Pravin Tarde) यांनी केले होते. आता ‘धर्मवीर 2’ चे देखील दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार असून चित्रपटाची निर्मिती देखील मंगेश देसाई करणार आहे. त्यांच्या टीमने जेजूरीच्या खंडेरायाचे दर्शन घेत चित्रपटाची घोषणा केली. सोशल मीडियावर देखील त्यांनी फोटो शेअर करत ही माहिती सर्वांना दिली आहे.

‘धर्मवीर 2’ या चित्रपटाचे पोस्टर (Dharmaveer 2 Poster Out) चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहे.
याखील कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “अनेक दिवसांपासून सुरु असलेली चर्चा आता प्रत्यक्षात उतारणार….
सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की, जेजुरी येथील खंडोबाचे दर्शन घेऊन आज तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आणि
आशीर्वादने ‘धर्मवीर २’ ची आज मी अधिकृत घोषणा करत आहे. ‘धर्मवीर २’ मधून उलगडणार
‘साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट…!” असे मंगेश देसाई यांनी लिहिले आहे. ‘धर्मवीर 2: मुक्काम पोस्ट ठाणे’
(Dharmaveer 2: Mukkam Post Thane) या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये देखील ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ अशी
ओळ लिहिण्यात आली आहे. यामुळे प्रेक्षकांना ‘धर्मवीर 2’ चित्रपटाचे वेध लागले असून या चित्रपटातील गोष्ट
आनंद दिघे यांच्या आयुष्यातील नवे पैलू उलघडून सांगणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Narendra Modi | ‘ठाकरेंनीच महाराष्ट्रात युती तोडली, भाजपने नाही’; पंतप्रधान मोदींचं मोठं विधान

Maharashtra Rain | महाराष्ट्रात 10 ऑगस्टपर्यंत कुठेही तीव्र हवामानाचा इशारा नाही

Mahesh Babu | दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूच्या नावावर आहे असा ‘विक्रम’ जो आत्तापर्यंत कोणत्याही अभिनेत्याला मोडता आलेला नाही