Maharashtra Rain | महाराष्ट्रात 10 ऑगस्टपर्यंत कुठेही तीव्र हवामानाचा इशारा नाही

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain | जुलै महिन्याच्या अखेरच्या पंधरा दिवसामध्ये राज्यातील (Maharashtra Weather) अनेक ठिकाणी पावसाने (Rain) धुमाकूळ घातला होता. दरम्यान, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाची गती कमी झाल्याचे दिसत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 10 ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज (Rain Forecast) असला तरी कुठेही तीव्र हवामानाचा (Indian Meteorological Department-IMD) अंदाज नाही. येत्या तीन ते चार दिवस हलका ते मध्यम पाऊस असणार आहे. (Maharashtra Rain)

राज्यात (Maharashtra Rain) जुलै महिन्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला होता. ऑगस्ट महिन्यात मात्र पावसाने अनेक ठिकाणी विश्रांती घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातील अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली. यापूर्वी जुलै महिन्यात कोकण (Konkan) आणि विदर्भात (Vidarbha) झालेल्या अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला होता. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर कमी होऊ लागला आहे.

दरम्यान, मुंबई (Mumbai) आणि कोकणाच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी बसरण्याचा अंदाज
हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) व्यक्त करण्यात आला आहे.
या भागांमध्ये अधून मधून सूर्यप्रकाश (Sunshine) पाहायला मिळतो.
तर दुसरीकडे बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यावर मात्र दुष्काळाचे सावट आहे.
सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यातल्या सर्व प्रकल्पांमध्ये 31.59 टक्के पाणीसाठा आहे.
या सगळ्याचा परिणाम पेरणी झालेल्या पिकांवरही होण्याची शक्यता आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | शरद पवारांविषयी आदर, म्हणून राष्ट्रवादी पक्ष फोडला का?; राऊतांची मोदींवर खोचक टीका

Prof. Hari Narke Passed Away | ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन