महिला पंडितने लावून दिलं मिर्झाचं लग्न; फोटो सोशल मीडियावर व्हायरल, चाहते म्हणाले….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झाचे सोमवारी बिझनेसमन वैभव रेखासोबत लग्न झाले. त्यानंर दीया मिर्झाच्या लग्नाची छायाचित्रे सोशल मीडियावर आली असून हे फोटोज आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. चित्रांमधील मिर्झा आणि वैभव रेखा यांच्या लुक व्यतिरिक्त आणखी एक बाब लक्षात घेण्यासारखी होती. विशेष म्हणजे दीया मिर्झाचं लग्न एका महिला पंडितने लावून दिलं आहे.

लग्नाचा फोटो शेअर करताना दीयाने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, प्रेम हे एक पूर्ण चक्र आहे. ज्याला आपण घरी बोलवतो. हाक ऐकतो, त्यासाठी दार उघडतो आणि नंतर त्यास भेटतो, हे किती जादूई आहे ?.

फोटोत दिया मिर्झा पती वैभवच्या डाव्या बाजूस बसलेली दिसत आहे. दोघे पती-पत्नी हवन कुंडासमोर आहेत. जवळ बसलेले पंडित हवन कुंडात तूप टाकत आहेत.

चाहत्यांनी लवकरच याची दखल घेतली आहे. त्यानंतर कमेंट बॉक्समधील अनेक चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले की,पंडितने …. ती खर्‍या अर्थाने स्त्रीवादी जगात आहे.

दुसर्‍याने लिहिले की, महिला पंडित प्रथमच पाहिले आहे. तर, आणखी एकाने म्हंटलं यी, मी चुकीचे नाही ना, हि महिला पंडित मंत्र जप करीत आहे.