Diabetes | डायबिटीज रूग्णांनी ‘या’ पांढर्‍या गोष्टी अजिबात सेवन करू नये, जाणून घ्या कोणत्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes | मधुमेहाच्या रुग्णांनी (Diabetes Patients) आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रक्तातील साखर नियंत्रणात (Blood Sugar Level) ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मधुमेहाच्या रुग्णांना अनेक गोष्टी खाणे आणि पिणे वर्ज्य आहे. दुसरीकडे जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल करून मधुमेह (Diabetes) नियंत्रणात ठेवता येतो. असे केल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.

 

मधुमेहाच्या रुग्णांनी कार्बोहायड्रेट (Carbohydrate), फॅट (Fat), साखरयुक्त पदार्थ (Sugary Foods) खाणे टाळावे. मात्र अन्नामध्ये तीन प्रकारचे कार्बोहायड्रेट असतात – स्टार्च (Starch), शुगर (Sugar) आणि फायबर (Fiber). मधुमेह असलेल्या लोकांसाठी स्टार्च आणि साखर ही सर्वात मोठी समस्या आहे कारण शरीर त्यांना ग्लुकोजमध्ये (Glucose) रूपांतरीत करते.

 

रिफाईंड कार्ब्ज (Refined Carbs), किंवा रिफाईंड स्टार्च (Refined Starch), प्लेट्सपर्यंत पोहोचण्यापूर्वी प्रक्रियेद्वारे तोडले जाते. यामुळे शरीर त्यांना लवकर शोषून घेते आणि त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते. यामुळे शरीरातील ब्लड शुगर लेव्हल वाढते.

 

दररोज वापरल्या जाणार्‍या काही पांढर्‍या रंगाच्या पदार्थांमध्ये स्टार्च आणि साखरेसारख्या कार्ब्जने भरलेली असतात. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. अशा कोणत्या पांढर्‍या गोष्टी आहेत ज्यांचे मधुमेहींनी (Diabetes) अजिबात सेवन करू नये ते जाणून घेवूयात…

 

1. पास्ता (Pasta)
पास्ता सॉस, क्रीम, चीज आणि भरपूर बटर घालून बनवला जातो. यामुळे तुम्हाला भरपूर कॅलरीज (Calories), फॅट आणि कार्बोहायड्रेट्स मिळतात. तो मैद्याने बनवला जातो, जो शरीरातील ब्लड शुगर लेव्हल वाढवू शकतो. त्यामुळे लठ्ठपणाचा (Obesity) धोकाही वाढतो. मधुमेहींनी पास्ता खाणे टाळावे.

2. बटाटा (Potato)
बटाटा जवळपास सगळ्यांनाच आवडतो आणि त्याशिवाय कोणतीही भाजी चवदार होत नाही. बटाट्यामध्ये कॅलरीज, कार्बोहायड्रेट्स, फॅट, प्रोटीन (Protein) आणि फायबर (Fiber) असतात. त्यात हाय ग्लायसेमिक इंडेक्स (High Glycemic Index) आहे आणि तो मधुमेहाच्या रुग्णांसाठी योग्य नाही. बटाटा खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगरचे प्रमाण वाढते.

 

3. मैदा (Flour)
मैद्यात स्टार्च (Starch) जास्त प्रमाणात असते तर जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरचे प्रमाण खूपच कमी असते. मैद्यापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. मैद्याचे जास्त सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या (Constipation Problem) निर्माण होऊ शकते. मैद्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index) खूप जास्त असतो. यामुळे मधुमेह आणि लठ्ठपणाचा त्रास होऊ शकतो.

 

4. साखर (Sugar)
साखरेपासून बनवलेल्या गोड पदार्थांमध्ये साखर आणि कर्बोहायड्रेट असतात.
साखरेत पौष्टिक घटक फार कमी प्रमाणात असतात आणि ती शरीरातील ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढवते.
साखरेमुळे वजन वाढणे (Weight Gain), हृदयविकार (Heart Attack Risk) आणि पक्षाघाताचा धोकाही (Risk of Paralysis) वाढतो.

5. तांदूळ (Rice)
एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक पांढरा भात (White Rice)
खातात त्यांना टाइप 2 मधुमेह (Type 2 Diabetes) होण्याचा धोका जास्त असतो.
अशावेळी जर तुम्हाला प्री-डायबिटीज (Prediabetes) असेल तर तुम्ही भात खाऊ नये.
पांढर्‍या तांदळाचा हाय ग्लायसेमिक इंडेक्स असतो,
ज्यामुळे शरीरातील ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes | diabetics should not consume these white things at all

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Disha Salian | दिशा सालियनच्या आईनं केली हात जोडून विनंती; म्हणाल्या – ‘राजकारणामुळं जगणं मुश्किल झालंय, आम्हाला जगू द्या’

 

7th Pay Commission | होळीसाठी सरकारी कर्मचार्‍यांना भेट! सरकार देतंय 10,000 रुपये अ‍ॅडव्हान्स; जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा

 

Side Effects Of Grapes | जास्त द्राक्ष खाल्ल्याने होऊ शकते आरोग्याचे नुकसान, लठ्ठपणापासून किडनीपर्यंतच्या होऊ शकतात समस्या