Diabetes Symptoms | तोंडातील ‘ही’ 2 लक्षणे डायबिटीजचा संकेत, तुम्हाला सुद्धा ‘या’ समस्या जाणवल्या का?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Symptoms | मधुमेहाचा आजार (Diabetes) हळूहळू मानवी शरीराला पोकळ बनवतो, म्हणून त्याला सायलेंट किलर असेही म्हणतात. मधुमेहामध्ये ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) वेळीच नियंत्रणात आणली नाही तर हा आजार माणसाला मृत्यूच्या दारात घेऊन जाऊ शकतो. यामुळे हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक, हृदयविकार आणि मज्जातंतूंचे नुकसान (High Blood Pressure, Stroke, Heart Attack And Nerve Damage) होण्याचा धोका लक्षणीय वाढतो (Diabetes Symptoms).

 

WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) च्या मते, 2019 मध्ये मधुमेह हे मृत्यूचे नववे प्रमुख कारण होते. म्हणूनच मधुमेहाची लक्षणे वेळीच ओळखणे डॉक्टरांना महत्त्वाचे वाटते (Diabetes Two Symptoms In Mouth You Should Never Ignore It).

 

तोंडात दिसणारी मधुमेहाची लक्षणे (Symptoms Of Diabetes Inside Mouth)
मधुमेहाची दोन लक्षणे तोंडाच्या (Diabetes Symptoms) आतही दिसतात, असा दावा आरोग्य तज्ज्ञांनी केला आहे. मात्र, ही लक्षणे लोकांच्या सहज लक्षात येत नाहीत. परिणामी, शरीरात त्याचा धोका वाढतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोरडे तोंड म्हणजे तोंडात कोरडेपणा, तसेच तोंडातून गोड किंवा फळांचा वास येणे ही देखील मधुमेहाची लक्षणे आहेत. ही लक्षणे हाय ब्लड प्रेशर किंवा हायपोग्लाइसेमियाशी (High Blood Pressure Or Hypoglycemia) संबंधित असू शकतात.

 

या 7 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका (Don’t Ignore These 7 Symptoms)

खूप तहान लागणे

वारंवार लघवी होणे

आजारी वाटणे

अति थकवा

अंधूक दृष्टी

अचानक वजन कमी होणे

तोंडात, घशात किंवा शरीरावर कुठेही फोड येणे

जखम भरण्यास उशीर होणे

मधुमेहाचे दोन प्रकार (Two Types Of Diabetes)
टाईप-1 आणि टाईप 2 मधुमेहाचे (Type-1 Diabetes And Type 2 Diabetes) दोन प्रकार आहेत. मधुमेह असलेल्या प्रौढांपैकी सुमारे 10 टक्के लोक टाईप-1 चे बळी आहेत, जे टाईप-2 पेक्षा वेगळे आहे. यामध्ये शरीराची इम्युनिटी इन्सुलिन तयार करणार्‍या पेशींवर हल्ला करू लागते. परिणामी, टाईप 1 डायबिटीजमध्ये नियमितपणे इन्सुलिनची आवश्यकता असते.

 

तर टाईप-2 मधुमेहामध्ये शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा पेशी योग्य प्रतिसाद देऊ शकत नाहीत. टाईप 1 मधुमेह जास्त वजनाशी संबंधित आहे, ज्याचा उपचार करता येऊ शकत नाही. अशा लोकांना आपले वजन नियंत्रणात ठेवावे लागते. तसेच खाण्यापिण्याच्या बाबतीतही खूप काळजी घ्यावी लागते.

 

Web Title :- Diabetes Symptoms | diabetes two symptoms in mouth you should never ignore it may indicate high blood sugar

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes च्या रूग्णांचे असे असावे दुपारचे जेवण, ‘या’ वस्तूच्या भाकरीसोबत खा ‘ही’ डाळ

 

Fruits And Vegetables For Asthma | ‘या’ फळे आणि भाज्यांमुळे होतात दम्याची लक्षणे कमी; जाणून घ्या

 

Diabetes | ‘या’ चुकांमुळे वाढते ब्लड शुगर, जाणून घ्या कसा होता डायबिटीज