अबब ‘या’ व्यापार्‍याकडे देशातील सर्वा महागडी गणेश मूर्ती, 500 कोटी रूपये किंमत, जाणून घ्या

वृत्तसंथा – गणेश उत्सवादरम्यान बाजरात आपल्याला अनेक प्रकारच्या गणेश मूर्ती पाहायला मिळतात. त्यातील काही मूर्ती स्वस्त असतात तर काही महाग. परंतु गुजरात मधील डायमंड सिटी अशी ओळख असेलेल्या सुरत या शहरामध्ये एका व्यापाऱ्याने हिऱ्यांने बनलेल्या गणेशमूर्तीची आपल्या घरी स्थापना केली आहे. सुरत मधील कतारगाम भागात राहणारे राजेश पांडव हे एक हिऱ्याचे व्यापारी आहेत. प्रति वर्षाप्रमाणे या वर्षीही पांडव यांनी आपल्या घरी हिऱ्याच्या गणेश मूर्तीची स्थापना केली आहे.
५०० करोड रुपयांची हिऱ्याची गणेशमूर्ती

मूर्तीची किंमत तब्बल ५०० कोटी रुपये आहे. ही देशातील सर्वात महागडी गणेश मूर्ती असल्याचे सांगितले जात आहे. एखाद्याच्या घरात ५०० करोड रुपयांची मूर्ती आहे असे म्हटले तर आपला विश्वास बसणार नाही. परंतु , सुरत मधील राजेश पांडव यांनी गणेश उत्सवाच्या निम्मिताने २७.७४ केरेट च्या हिऱ्याच्या गणेशमूर्तीची आपल्या घरी स्थापना केली आहे. राजेश सांगतात की, मूर्तीची किंमत अमूल्य आहे. हा त्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. लोक जरी या मूर्तीकडे देशातील सर्वात महागडी मूर्ती म्हणून पाहत असले तरी राकेश पांडव हे मात्र या मूर्तीला एक अमूल्य मूर्ती मानतात.

गणपती सारखा दिसणारा हिरा, आला होता दक्षिण आफ्रिकेतून

गणपती सारखा दिसणारा हा हिरा राजेश पांडव यांच्याकडे २००५ मध्ये आला होता. तो दक्षिण आफ्रिकेमधून आला असल्याचे पांडव सांगतात. हा हिरा त्यांनी विकत घेतला होता. हा हिरा हुबेहूब श्री गणेशासारखा दिसत असल्यामुळे प्रतिवर्षी गणेश उत्सवाच्या काळात त्याची स्थापना करून पूजा अर्चना करतात. या सर्वात महागड्या गणेशमूर्तीची नियमित पूजा अर्चना केली जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –