अभिनेत्री डायना पेंटीची दीपिका पादुकोणसाठी खास पोस्ट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार डायना पेंटी सध्या चर्चेत आली आहे. याचं कारणं म्हणजे तिनं अभिनेत्री दीपिका पादुकोणसाठी लिहिलेलं पत्र. सध्या या पत्राची खूप चर्चा होत आहे.

डायनानं दीपिकासाठी खास पोस्ट लिहिली आहे. यात डायना म्हणते, “दीपिका पादुकोणसोबत माझा पहिला सिनेमा होता. ती एक उत्तम अभिनेत्री तर आहेच परंतु उत्तम सहकालाकार देखील आहे. त्यावेळी मी नवीन होते आणि ती आघाडीची अ‍ॅक्ट्रेस होती. दीपिका कायमच माझ्यासोबत आपुलकीनं वागली. मला कधीच कसला भेदभाव जाणवला नाही.”

पुढे बोलताना डायना म्हणाली, “दीपिका कायम स्माईल करत असते. मला आजही शुटींगचा पहिला दिवस आठवतो. मी हॉटेलवर होते. तिनं मेसेज करत मला जेवायला आमंत्रण दिलं आम्ही सोबत जेवयला गेलो. ती कामाच्या बाबातीत खूप चोख आहे. ती कायम वेळेवर सेटवर येते आणि कधी पॅकअप होईल याची वाट पहात नाही. ती कितीही वेळ काम करू शकते. या सगळ्यात ती कधीच जीमला जाणं मिस करत नाही.”

View this post on Instagram

#SaturdayVibes #MajorFlashback

A post shared by Diana Penty (@dianapenty) on

डायनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर मुंबई पोलीसांना मदत आणि समर्थन देण्यासाठी ती द खाकी हा प्रोजेक्ट करणार आहे. लवकरच ती रोमँटीक ड्रामा शिद्दतमध्ये काम करताना दिसणार आहे. जन्नतचे कुणाल देशमुख हा सिनेमा डायरेक्ट करणार आहे. डायनानं 2012 साली आलेल्या सैफ अली खान आणि दीपिका पादुकोण यांच्या कॉकटेल सिनेमातून करिअरला सुरुवात केली होती. यानंतर ती हॅप्पी भाग जाएगी, लखनऊ सेंट्रल, परमाणु द स्टोरी ऑफ पोखरण आणि हैप्पी फिर भाग जाएगी अशा अनेक सिनेमात दिसली आहे.

 

View this post on Instagram

#SocialDistancing 101

A post shared by Diana Penty (@dianapenty) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like