महान फुटबॉल खेळाडू मॅराडोना यांच्या मृत्यूवर प्रश्न, डॉक्टरांच्या घरावर आणि ऑफिसवर पोलिसांची ‘रेड’

नवी दिल्ली : अर्जेंटीनाचे जगप्रसिद्ध फुटबॉल खेळाडू दिएगो माराडोना यांचे डॉक्टर लीयोपोल्डो लुके यांच्या क्लिनिक आणि घरावर पोलिसांनी छापा मारला आहे. अर्जेंटीनाच्या मीडियाने यास दुजोरा दिला आहे. पोलिस या गोष्टीचा तपास करत आहेत की, मॅराडोना यांच्या उपचारादरम्यान निष्काळजीपणा करण्यात आला होता का.

मॅराडोना यांचे कुटुंबिय आणि वकिलांचे म्हणणे आहे की, डॉक्टरांनी उपचारादरम्यान निष्काळजीपणा केला होता. याच कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला. मॅराडोना यांच्या मुलीने आरोप केला आहे की, डॉक्टरांकडून त्यांना योग्य औषध देण्यात आले नव्हते, यामुळेच त्यांचा मृत्यू झाला.

60 वर्षाचे मॅराडोना यांचे 25 नोव्हेंबरला हार्ट अटॅकमुळे अर्जेंटीनाची राजधानी ब्यूनस आयरस येथील घरी निधन झाले होते. मॅराडोना यांचे वकील मटियास मोरला यांनी निधनाची माहिती जहीर केली होती. यापूर्वी महिन्याच्या सुरूवातीला महान फुटबॉलर मॅराडोना यांना मेंदूच्या यशस्त्री ऑपरेशननंतर आठ दिवसांनी हॉस्पीटलमधून सुटी देण्यात आली होती. याशिवाय दारूचे व्यसन सोडवण्यासाठी सुद्धा त्यांच्यावर उपचार सुरू होते.

मॅराडोना यांचे वकील मटियास मोरला यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. मोरला यांनी म्हटले की, मॅराडोना यांच्या घरी अ‍ॅम्ब्युलन्स पोहचण्यासाठी 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला होता. त्यांनी थेटपणे हॉस्पीटलवर उपचार उशीर केल्याचा आरोप केला आहे.

हँड ऑफ गॉड मॅराडोना
मॅराडोना यांना जगातील महान फुटबॉल खेळाडूंपैकी एक महान खेळाडू होते. हँड ऑफ गॉड नावाने ते जगात प्रसिद्ध होते. 1986 मध्ये अर्जेंटीनाला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात त्यांनी मोठी भूमिका निभावली होती.