सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण ! ED कडून रियाच्या CA ची चौकशी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत प्रकरणानं अनेकदा वेगळं वळण घेतलं आहे. रोजच काही नवीन खुलासे होताना दिसत आहेत. अलीकडेच या प्रकरणी ईडीनं मनी लाँड्रींगचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर आता ईडीनं मंगळवारी (दि 4 ऑगस्ट) सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्या सीएची विचारपूर करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील ईडीच्या शाखेत ही चौकशी सुरू आहे. रितेश शहा यांच्याकडून ईडीला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवायची असल्याचं सांगितलं जात आहे.

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस विरूद्ध बिहार पोलीस असा वाद रंगला आहे. हा वाद आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सुशांतच्या वडिलांच्या व्हिडीओमुळं आता आणखी एका मुद्द्यावर चर्चा रंगली आहे. सुशांतच्या सुरक्षेबाबत फेब्रुवारीमध्येच त्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केल्याचं त्यांनी आपल्या व्हिडीओत म्हटलं होतं. यानंतर बिहारच्या डीजीपींनी आता मोठं वक्तव्य केलं आहे. डीजीपी गुप्तेश्वर पांडेय यांनी एक सवाल उपस्थित केला आहे.

गुप्तेश्वर पांडेय म्हणाले, “सुशांतच्या अकाऊंटमध्ये गेल्या 4 वर्षात तब्बल 50 कोटी आले आणि आश्चर्य म्हणजे हे पैसे काढले गेले. 1 एका वर्षात त्याच्या अकाऊंटला 17 कोटी रुपये आले आणि त्यातून 15 कोटी रुपये काढण्यात आले. यावर चौकशी होणं गरजेचं नव्हतं का ?” असा सवाल उपस्थित करत अशा अनेक मुद्द्यांना दाबण्यात आलाचा आरोपही त्यांनी केला आहे. निर्भीड आणि स्पष्टवक्ता अधिकारी अशी पांडेय यांची ओळख आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी बिहार सरकारनं मोठं पाऊल टाकत या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडून करवून घेण्याचा निर्णय घेतला आहे. सुशांतच्या वडिलांच्या आग्रहामुळं मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे.

सुशांतचं कुटुंब सतत सीबीआय चौकशीची मागणी करत होतं. बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यातही आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. सुशांतच्या वडिलांनी या प्रकरणी नितीश कुमार यांची भेट घेऊन या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

‘मुंबई पोलीस पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ घालवतायेत’

सुशांतचे वडिल के के सिंह यांनी असा आरोप केला आहे की, मुबई पोलीस सुशांतच्या केसमधील पुरावे नष्ट करण्यासाठी तपासात वेळ घालवत आहेत. म्हणून या प्रकरणाची चौकशी सीबीआयनं करावी अशी मागणी आम्ही केली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तशी शिफारसही केली आहे.