Digestion In Monsoon | पावसाळ्यात डायजेशन सुधारण्यासाठी अवलंबा ‘या’ 5 आयुर्वेदिक टिप्स, पोटाच्या समस्या होतील दूर

नवी दिल्ली : Digestion In Monsoon | पावसाळ्यात बॅक्टेरियांना वाढण्यास अनुकूल वातावरण मिळते. यामुळे पचनसंस्थेशी संबंधित समस्या निर्माण होतात. पचनक्रिया मंद होते, अन्न उशिरा पचते. तसेच अपचन, गॅस, अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता अशा समस्या निर्माण होतात. पावसाळ्यात पचनक्रिया सुधारण्यासाठी खालील आयुर्वेदिक उपाय करू शकता (Ayurvedic Tips To Improve Digestion In Monsoon).

पाणीयुक्त फूड

पावसाळ्यात काकडी, टोमॅटो, सफरचंद, आंबट फळे, टरबूज आणि स्टड्ढॉबेरी यांचा आहारात समावेश करा. यामुळे पचनशक्ती वाढते, शरीर हायड्रेटेड राहते. आतडे ओलसर राहतात. बद्धकोष्ठता दूर होते. पोट साफ राहते. (Digestion In Monsoon)

लाईफस्टाईलमध्ये बदल

पावसात भिजल्यानंतर एसीमध्ये बसणे टाळा. पाय कोरडे ठेवा. पावसाळ्यात पचनक्रिया मंदावत असल्याने दिवसा झोपणे टाळा. सहज पचणारे अन्न खा.

आले

आल्याच्या छोट्या तुकड्यावर खडे मीठ टाकून ते जेवणापूर्वी चावून त्याचा रस चोखा. यामुळे पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

तूप

गायीच्या तुपाचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता दूर होते. गरम जेवणात १ चमचा तूप टाकून खा. यामुळे आतड्याची सूज सुद्धा कमी होते.

संतुलित आहार

पावसाळ्यात सकस आहार घ्या. आहारात तांदूळ, बार्ली, गहू, शेंगा आणि हरभरे यांसारख्या पदार्थांचा समावेश करा. कच्च्या भाज्या खाणे टाळा. मात्र, कोणताही आजार किंवा अ‍ॅलर्जीची समस्या असल्यास डॉक्टरांना विचारूनच या टिप्स करा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Soaked Almonds | बदाम भिजवून खाणे चांगले किंवा नाही? आवश्य जाणून घ्या काय आहे सत्य