Digital Media | आयटी पॅनलची Fake News वर कायदा करण्याची शिफारस, हिवाळी अधिवेशनात होऊ शकते चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Digital Media | फेक न्यूज (fake news) सामान्य लोकांसाठी किती धोकादायक आहेत, याचा अंदाज या गोष्टीवरून लावता येऊ शकतो की, अनेक ठिकाणी छोट्या हाणामार्‍यांसह मोठ्या हिंसा झालेल्या आहेत. आता यावर लगाम लावण्याची तयारी सुरू आहे. माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) बाबतच्या संसदीय पॅनलने (The Parliamentary Panel on Information and Technology) पारंपरिक आणि डिजिटल मीडिया (Digital Media) प्लॅटफार्मसाठी अनेक सुधारणा केल्या आहेत. यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात माहिती आणि तंत्रज्ञान संबंधी एक विशेष रिपोर्ट (fake news law) सादर होऊ शकतो.

मीडिया रिपोर्टनुसार आयटी पॅनलने आपल्या रिपोर्टमध्ये ‘राष्ट्र विरोधी’ भूमिकेची व्याख्या करण्यापासून टेलिव्हिजन रेटिंग बिंदूचे मूल्यांकन करणे आणि बनावट बातम्यांवर कारवाईसाठी समर्पित कायदा सादर करण्यासाठी एक चांगली प्रणाली सादर केली आहे.

एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, पॅनलने आपल्या रिपोर्टमध्ये पेड न्यूज (Paid News), फेक न्यूज (Fake News), टीआरपीसह (TRP) छेडछाड, मीडिया ट्रायल्स, पक्षपाती रिपोर्टिंगसारख्या प्रकरणांचा उल्लेख केला आहे.

फेक न्यूज प्रकरणांच्या जाणकारांनी सांगितले की,
फेक न्यूजने मीडियाच्या विश्वसनीयतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे,
हे निरोगी लोकशाहीसाठी चांगले नाही आणि जर निरोगी लोकशाही योग्यप्रकारे चालवायची असेल तर केवळ मीडियाकडून योग्य माहितीच्या प्रसारातूनच शक्य आहे.

वृत्तानुसार, मीडिया सेक्टसाठी तयार होत असलेल्या कायद्यात प्रिंट,
इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स (Digital Media) कव्हर केला जाईल.
म्हटले जात आहे की, प्रस्तावित कायदा, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया (Digital Media),
सिनेमा आणि नेटफ्लिक्स आणि हॉटस्टार सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर सुद्धा लागू केला जाईल.

 

Web Title :- Digital Media | it panel recommends law on fake news may be discussed in winter session marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Amazon | धक्कादायक गौप्यस्फोट ! पुलवामा हल्ल्यासाठी वापरलेल्या रसायनांची Amazon वरुन खरेदी, CAIT चा गंभीर आरोप

Pune Crime | फुकट बिर्याणी न दिल्याने हॉटेल मॅनेजरवर कोयत्याने सपासप वार; पुण्याच्या सिंहगड रोड परिसरातील घटना

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 730 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी