Dil To Pagal Hai | ‘दिल तो पागल है’ सिनेमाला 25 वर्ष पूर्ण; तर माधुरी आणि करिश्माने शेअर केली ‘हि’ स्पेशल पोस्ट

पोलीसनामा ऑनलाईन : बॉलीवूड (Bollywood) असो किंवा टॉलीवूड (Tollywood) असे काही चित्रपट असतात जे आजही चाहत्यांच्या मनात राज्य करत असतात. अशाच पद्धतीचा सिनेमा म्हणजे ‘दिल तो पागल है’ (Dil To Pagal Hai). या सिनेमाला सध्या 25 वर्षे पूर्ण झाले आहे. शाहरुख खान (Shah Rukh Khan), माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि करिष्मा कपूर (Karisma Kapoor) असे प्रसिद्ध कलाकार असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Box Office) हिट झाला होता. सध्या या (Dil To Pagal Hai) सिनेमाला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काही आठवणींना उजाळा देत सिनेमातील कलाकारांनी काही फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

याच आठवणी कायम लक्षात राहतात असे म्हणत करिष्मा कपूर यांनी सेट वरील काही फोटोज शेअर केले आहे. “आठवणी ज्या नेहमी लक्षात राहतात” असे कॅप्शन देऊन फोटो शेअर केले आहे. या फोटोंना चाहत्यांनी देखील चांगलाच प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले.

तर दुसरीकडे दिल तो पागल है (Dil To Pagal Hai) या सिनेमाला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने
माधुरी दीक्षित यांनी देखील आपल्या इन्स्टा अकाउंट वर या सिनेमातील सुप्रसिद्ध असे ‘अरे रे ये क्या हुआ’
या गाण्यावर डान्स रिक्रेट केला आहे. त्यांचा हा डान्स पाहून चाहते देखील नेहमीप्रमाणे घायल झाले आहेत.
तर अनेकांनी हा सिनेमा जणू काही आत्ताच रिलीज झाला आहे अशी भावना देखील व्यक्त केली आहे.

Web Title :-  Dil To Pagal Hai | dil to pagal hai completed 25 years madhuri dixit and karishma kapoor shares special

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा