Nanar Refinery | नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘प्रकल्प पूर्णपणे…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सध्या मोठे प्रकल्प हा चर्चेचा विषय आहे. कारण, मागील चार महिन्यात चार मोठे प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटले आणि शेजारील राज्य गुजरातला गेले. त्यामुळे पुन्हा एकदा नाणार प्रकल्पाने (Nanar Refinery) तोंड वर काढले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाणार प्रकल्पाबाबत (Nanar Refinery) मोठे विधान केले आहे.

टाटा एअरबसवरुन सुरु असलेले आरोप प्रत्योरोप यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले. यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aghadi) टीका देखील केली. काही लोकांनी नाणार येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध केल्याने हा प्रकल्प महाराष्ट्र (Maharashtra) आणि केरळ (Kerala) अशा दोन राज्यांत विभागून होऊ शकतो, असे फडणवीस म्हणाले. हा प्रकल्प पूर्णपणे महाराष्ट्राला मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे फडणवीस म्हणाले. तसेच यावेळी ते पुढे म्हणाले, गुंतवणुकीचा बाप म्हणजे महाराष्ट्रात येणारी रिफायनरी. या प्रकल्पाला मी गुंतवणुकीचा बाप यासाठी म्हणतो, कारण आजपर्यंत देशात येणारी ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. या प्रकल्पात तीन लाख कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक होणार होती. तसेच 1 लाख तरुणांना रोजगार मिळणार होते. त्याला काही लोकांनी विरोध केल्यामुळे हा प्रकल्प येऊ शकला नाही. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने रांजनगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (Electronic Manufacturing Cluster) उभे करण्यास मंजुरी दिली असल्याचे सांगितले.

महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी नाणार प्रकल्पाला (Nanar Refinery) विरोध केला आहे.
त्यामुळे ते लोक तीन लाख कोटी गुंतवणूक करणाऱ्या प्रकल्पाला विरोध करत असतील,
तर त्यांना महाराष्ट्राच्या गुंतवणुकीवर बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असे फडणवीस म्हणाले.

Web Title :-  Nanar Refinery | nanar refinery project will divide into maharashtra and kerala said devendra fadnavis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा