‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी अभिनेता दिनो मोरिया आणि डीजे अकील यांना ‘समन्स’ जारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया आणि डीजे अकील यांचं नाव जवळपास साडेचौदा हजार कोटींची व्याप्ती असलेल्या घोटाळ्यात समोर आलं आहे. संदेसरा बँक कर्ज प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाने दिनो आणि अकील यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. दिनो आणि अकील यांच्यावर आर्थिक फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे.

..म्हणून दिनो मोरिया आणि डिजे अकील यांना समन्स जारी

स्टर्लिंग बायोटेक लिमिटेड, संदेसरा ग्रुप आणि नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दीप्ती चेतन संदेसरा यांच्यावर आरोप आहेत की, त्यांनी बँकांना १४ हजार ५०० कोटींचा चुना लावला आहे. या प्रकरणी सीबीआयने २०१७ साली एफआयआर केली. यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरु झाली. समोर आलेल्या माहितीनुसार, दिनो आणि डीजे अकील सोबत या कंपनीचे काही व्यवहार झाले आहेत. त्यामुळे दिनो आणि अकील यांना समन्स जारी करण्यात आलं आहे.

संदेसरा बंधूंविरोधात ५ हजार ७०० कोटींच्या फसवणुकीची केस दाखल

चेतन जयंतीलाल संदेसरा आणि नितीन जयंतीलाल संदेसरा या स्टर्लिंग बायोटेकच्या मालक असलेल्या संदेसरा बंधूंवर खोट्या कंपन्या दाखवून बँकांकडून कर्ज लाटल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील फरार आरोपींविरोधात ईडीने लुकआऊट नोटीस जारी केली आहे. तर संदेसरा बंधूंविरोधात सीबीआयने ५ हजार ७०० कोटी रुपयांच्या फसवणुकीची केस दाखल केली आहे. याबाबत सांगताना ईडीने दावा केला आहे की, या घोटाळ्याची व्याप्ती ही पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यापेक्षाही मोठी आहे.

दिनो मोरियाविषयी थोडक्यात…

२००२ साली राज या सिनेमामुळे प्रकाशझोतात आलेल्या दिनो मोरियाने १९९९ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. प्यार में कभी कभी असे या सिनेमाचे नाव आहे. राज सिनेमात दिनो बिपाशा बसू सोबत दिसला होता. यानंतर त्याचे सिनेमे विशेष चालले नाही. यानंतर दिनो सिनेमांपासून दूरच दिसला. २०१५ साली आलेल्या अलोन या सिनेमा दिनो पाहुणा कलाकार म्हणून दिसला होता.

 

महिलांनो, बाळंतपणानंतर पुन्हा मिळवता येऊ शकतो कमनीय बांधा

लठ्ठपणाचा रोगप्रतिकारक शक्तीवर होतो परिणाम, काळजी घेणे गरजेचे

शरीराला पाण्याची गरज का असते ? जाणून घ्या ही ५ कारणे

लोकसभा निवडणूकीत वंचितला डावलणाऱ्या कॉंग्रेसची विधानसभेसाठी ३ जूलैला ‘बोलणी’

उत्तरप्रदेशमध्ये योगी सरकारच्या निर्णयावर बरसल्या मायावती