Dipali Sayyed | दीपाली सय्यद शिंदे गटात जाणार? नाराज आहात का, विचारल्यावर म्हणाल्या – ‘माझा आवाज मातोश्रीपर्यंत जाण्यापासून रोखणारे…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना (Shivsena) नेत्या अभिनेत्री दीपाली सय्यद नाराज (Dipali Sayyed) असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यांनी मध्यंतरीच्या काळात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गाठीभेटी सुद्धा घेतल्या होत्या. याशिवाय बंडखोरीच्या नाट्यात त्यांनी दोन्ही नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. पण दोन नेत्यांना एकत्र आणता-आणता दीपाली सय्यद (Dipali Sayyed) यांचा कल शिंदे गटाकडे वाढल्याचे जाणवत आहे. आज एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा नाराजी व्यक्त केली.

 

दीपाली सय्यद (Dipali Sayyed) म्हणाल्या, काही गोष्टींसाठी नियोजन आखावे लागते. त्याला वेळ द्यावा लागतो. या गोष्टी कृतीतूनच लोकांपर्यंत पोहोचू शकतात. मागील काही दिवसांपासून मी त्याच कामात होते. लवकरच ते लोकांपर्यंत पोहोचेल. प्रत्येकजण आपापले काम करतो. माझी कोणावरही नाराजी नाही. प्रत्येकजण आपली जागा स्वत:च्या कर्तृत्वाने मिळवत असतो. त्यामुळे मी नाराज नाही.

 

दीपाली सय्यद म्हणाल्या, मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र मोठ्या नेत्यांच्या मनात काय असेल, हे आपण सांगू शकत नाही. हे दोन्ही नेते एकत्र यावेत अशी माझी इच्छा होती. भविष्यातही त्यांनी एकत्र यावे, असे मला वाटते.

त्या पुढे म्हणाल्या, उद्धव ठाकरे यांनी दौर्‍याला सुरुवात केली आहे. त्यांच्या दौर्‍याला यश मिळो. माझ्या शुभेच्छा असतील.
त्यांनी अगोदरच या दौर्‍यांना सुरुवात करायला हवी होती. माझे पदाधिकारी किती मजबूत आहेत,
हे नेत्याने तपासले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी हे केले असते, तर शिवसेना पक्षात फूट पडली नसती.

 

दीपाली म्हणाल्या, माझा आवाज मातोश्रीपर्यंत जाण्यापासून रोखणारे बरेच लोक होते.
आगामी काळात नक्कीच त्यांची नावे सांगेन. काही काम करायचे असेल तर आता आम्ही थेट मुख्यमंत्र्यांना भेटतो.
आम्ही ते काम मुख्यमंत्र्यांना सांगतो. त्याची पुढे अंमलबजावणीही होते. ते खूप महत्त्वाचे आहे.

 

Web Title :- Dipali Sayyed | deepali sayyad comment on joining eknath shinde group

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rohit Patil | कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीची मते फुटल्यावर रोहित पाटलांचा संजय पाटलांना प्रश्न

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे उद्यापासून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करणार

Aditya Thackeray | तुमच्या दोघांपैकी जे कोणी खरे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी माझ्या मागणीची दखल घ्या – आदित्य ठाकरे