Rohit Patil | कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीची मते फुटल्यावर रोहित पाटलांचा संजय पाटलांना प्रश्न

कवठेमहाकाळ : पोलीसनामा ऑनलाइन – सांगलीच्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीत (Kavathe Mahankal Nagar Panchayat) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची सत्ता संपुष्टात आली आहे. नगराध्यक्ष निवडीत भाजपने (BJP) मते फोडल्याने राष्ट्रवादीला धक्का बसला. त्यामुळे रोहत पाटील (Rohit Patil) गटाचे बहुमत असून देखील त्यांना नगराध्यक्ष निवडता आला नाही. त्यावर आता रोहित पाटील (Rohit Patil) यांनी भाजप खासदार आणि त्यांचे विरोधक संजय पाटील (MP Sanjay Patil) यांनी प्रश्न विचारला आहे.

 

छळ, कपट आणि अहंकार खासदाराच्या तोंडी शोभत नाही. एवढी ताकद लावून त्यांना निवडणूक जिंकता आली नाही. निकाल चिठ्ठीवर गेला होता. तर पराभव आमचा झाला की त्यांचा, हे पहावे लागेल. आम्हाला सत्तेचा गर्व कधी झाला नाही. आम्ही सत्तेच्या गर्तेत कधीच अडकलो नाही, असे रोहित पाटील म्हणाले.

 

पुढे बोलताना रोहित पाटील (Rohit Patil) म्हणाले, कवठेमहांकाळच्या नगराध्यक्ष निवडीत आर आर पाटील (R R Patil) सात वेळी विजयी झाले होते. सुमन पाटील (Suman Patil) दोन वेळा विजयी झाल्या होत्या. पण आम्हाला आजपर्यंत सत्तेचा गर्व कधी चढला नाही.

दहा महिन्यांपूर्वी कवठेमहांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता आली होती.
पण दोन दिवसांपूर्वी झालेल्या नगराध्यक्षांच्या निवडीत राष्ट्रवादीची मते फुटली.
राष्ट्रवादीला 8 आणि भाजपच्या उमेदवार सिंधू गावडे (Sindhu Gawde) यांना 9 मते पडली.
मुळात राष्ट्रवादीची बारा मते असून देखील त्यांच्या पक्षात बेशिस्त पाहायला मिळाली.
त्यावर रोहित पाटील यांना सत्ता सोडावी लागली.

 

Web Title :- Rohit Patil | rohit patil gave answer to sanjaykaka patil on kavathemahakal nagarpanchayt election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे उद्यापासून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करणार

Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस फोडणे सोपं नाही, कारण…, आ. रोहित पवारांनी भाजपला सुनावलं

Narayan Rane | उद्धव ठाकरेंचे राजकारण मातोश्रीपूरते मर्यादीत, नारायण राणेंचे टीकास्त्र