Aditya Thackeray | तुमच्या दोघांपैकी जे कोणी खरे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी माझ्या मागणीची दखल घ्या – आदित्य ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेच्या ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray group) आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे. आपले दोनपैकी जे कोणी खरे मुख्यमंत्री असतील त्यांनी शेतकऱ्यांचा विचार करुन माझ्या मागणीची दखल घ्या, असे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीसांना सुनावले आहे.

 

परतीच्या पावसाचा सर्वात मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या सणात तोंडाजवळ आलेला घास हिरवला गेल्यासारखे शेतकऱ्यांसोबत झाले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले आहे. तसेच सरकारकडे राज्यात ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांसाठी 100 कोटी रुपयांचा शिधा त्यांच्यापर्यंत पोहोचला जात नसल्याचे देखील विरोधकांचे म्हणणे आहे.

 

आदित्य ठाकरे मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत असताना म्हणाले, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आम्ही तेव्हाही सांगत होतो की, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा. आत्ताही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकदा सरकारकडून फक्त घोषणा झाल्या आहेत. पुढे त्यावर काही केले नाही. त्यासाठीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वत: बांधावर जाणार आहेत आणि काही शेतकरी बांधवांची भेट घेणार आहेत. तसेच महत्वाच्या समस्यांवर दीर्घकालीन उपाय करण्याची हीच योग्य वेळ आहे. शहरी आणि ग्रामीण भागांतील नुकसान पावसामुळे वाढले आहे. सरकारचे त्यांच्याकडे लक्ष नाही.

महाविकास आघाडीच्या काळात आम्ही दावोसला जाऊन 80 हजार कोटींची गुंतवणूक राज्यात आणली होती.
त्यानंतर आमचे सरकार पाडले गेले. त्यामुळे राज्यातून वेदांता फॉक्सकॉन, बलट्रक पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क हे प्रकल्प निघून गेले.
आता वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्री आपल्या राज्यात येऊन सादरीकरण करत आहेत.
पण अजूनही आपले दोनपैकी जे कुणी खरे मुख्यमंत्री असतील, त्यांचे उत्सव मंडळे, १२-१ वाजेपर्यंत उत्सवाला परवानग्या हेच सगळे सुरु आहे.
कुठेही महिला, बेरोजगार तरुण, शेतकऱ्यांसाठी ते बोलत नाहीत.  अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray)
एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) टोला लगावला आहे.

 

Web Title :- Aditya Thackeray | shivsena aaditya thackeray mocks cm eknath shinde devendra fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ambadas Danve | उद्धव ठाकरेंना घाबरुन ते तिघे एकत्र येतील, पण…,  ठाकरे-शिंदे-फडणवीसांच्या भेटीवर अंबादास दानवेंचा टोला

Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस फोडणे सोपं नाही, कारण…, आ. रोहित पवारांनी भाजपला सुनावलं

Narayan Rane | उद्धव ठाकरेंचे राजकारण मातोश्रीपूरते मर्यादीत, नारायण राणेंचे टीकास्त्र