Dipali Sayyed | शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांचा टोला; म्हणाल्या – ‘राजसाहेब लवकरात लवकर बरे व्हा, नाहीतर विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर फडणवीस…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Dipali Sayyed | राज्यसभेनंतर आज विधान परिषदेसाठी (Maharashtra MLC Election-2022) मतदान होत आहे. यामुळे भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आपली शक्ती पणाला लावली आहे. दरम्यान दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्यावर लिलावती रुग्णालयामध्ये आज शस्त्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे मनसे पदाधिकारी त्यांच्या स्वास्थासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. त्यातच शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनीही राज ठाकरेंना लवकर बरं व्हा असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु, दिपाली सय्यद यांनी शुभेच्छा देतानाही राजकीय टोला लगावला आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून दिपाली सय्यद (Dipali Sayyed) भाजप, मनसे नेत्यांवर टीका करताना दिसत आहे.
सोशल मीडियावरील अकाऊंट्सवरही त्या अधिक सक्रिय होताना दिसत आहेत.
अशाच पद्धतीचं वक्तव्य दिपाली सय्यद यांनी राज ठाकरेंची नियोजित शस्त्रक्रिया आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीचा धागा पकडत केलं आहे.

 

https://twitter.com/deepalisayed/status/1538588419391213570

दिपाली सय्यद यांनी विधान परिषद निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकटेच पडू नयेत
म्हणून राज ठाकरेंनी लवकर बरं व्हावं असं म्हटलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की,
“माननीय राजसाहेब आपण लवकरात लवकर बरे व्हा, नाहीतर विधानपरिषद निवडणुकीनंतर फडणवीस साहेब एकटे पडतील,”
तसेच, “भोंगा अजून अर्धवट आहे,” असं देखील त्या म्हणाल्या आहेत.

 

Web Title :- Dipali Sayyed | dipali sayed wish raj thackeray to get well soon so
that he can support devendra fadnavis after mlc election 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा