प्रसिद्ध अभिनेत्री संगीताचा डर्टी पिच्चर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

तामिळ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संगीता जोलाला देहविक्री करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चेन्नईमधील खासगी रिसाॅर्टमध्ये कथित देहविक्री चालवत असल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबत टाईम्स आॅफ इंडियाने वृत्त दिलेलेल्या वृत्तानुसार प्राथमिक तपासात अनेक अभिनेत्रींनी नावे समोर आली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका खासगी रिसाॅर्टमध्ये संगीतासहित अनेक अभिनेत्रींना ताब्यात घेतलं आहे. तसेच तीन नवोदित अभिनेत्रींनाही यातून बाहेर काढण्यात आलं आहे.

या ठिकाणी हा व्यावसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरुन छापा टाकला असता हा प्रकार समोर आला. यामध्ये सुरेश नावाच्या एका व्यक्तीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच या प्रकरणात अनेक नावांचा खुलासा होण्याची शक्यता आहे. संगीता ही तामिळ टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून, तिने अनेक सिरियल्समध्ये देखील काम केलं आहे. दरम्यान वानी रानी च्या कॅरेक्टरने तिला फार मोठी प्रसिद्धी मिळवून दिली.तसेच काही तमिळ सिनेमातही तिने भूमिका साकारल्या आहेत.