कानात संसर्ग होणं म्हणजे काय ? ‘ही’ लक्षणं, कारणं अन् उपाय ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन –

कानात संसर्ग म्हणजे काय ?
कानात संसर्ग हा मधल्या कानाचा संसर्ग असून त्यात कानाच्या पडद्यामागे सूज येऊन तेथे द्रव जमा होतो. हे सर्दी (नासोफरींग्नायटीस), घसा दुखणं किंवा श्वासोच्छवासाच्या संसर्गामुळं होऊ शकते.

कानाच्या संसर्गाचे प्रकार पुढीलप्रमाणे-

कानात तीव्र संसर्ग – संसर्गासोबत कानात इंफ्युजन (कानाच्या पडद्यामागे असलेला एक चिकट द्रव पदार्थ)

याची काही लक्षणं पुढीलप्रमाणे –
– कान दुखणं
– ताप
– आजारी असल्यासारखं वाटणं
– अशक्तपणा
– किंचित बहिरेपणा
– कधी कधी कानाच्या पडद्यात छिद्र पडू शकते. यातून पस वाहू शकतो.
– कान ओढणे
– चिडचिड
– जेवण कमी जाणं
– खोकला आणि नाक वाहणं
– अतिसार
– तोल न सांभाळता येणं

काय आहेत याची कारणं ?
कधी कधी कानाच्या मध्यात श्लेष्मा जमा होण्यासाठी सर्दी कारणीभूत ठरते. म्हणूनच युस्टेशियन ट्युब (एक पातळ नळी जी कानाच्या मध्यातून नाकाच्या मागच्या बाजूपर्यंत धावते) सूजते किंवा अवरोधित होते, श्लेष्मा योग्यरित्या काढून टाकला जात नाही. म्हणून संसर्गामुळं सहजपणे कानाच्या मध्यभागी पसरतो.

काही अशा परिस्थिती ज्या कानात होणाऱ्या संसर्गाचा धोका वाढवतात त्या पुढीलप्रमाणे –

1) क्लेफ्ट पॅलेट – एक जन्मजात दोष जिथं बाळाच्या तोंडाचा वरचा भाग फाटलेला असतो.
2) डाऊन सिंड्रोम – एक अनुवांशिक विकार ज्याचं वैशिष्ट्य काही प्रमाणात शिक्षण घेण्यास असमर्थता आणि असाधारण शारीरिक रचना हे असतात.

काय आहेत यावरील उपचार ?
– तोंडी अँटीबायोटीक्स किंवा इयरड्रॉप्स
– औषधं (वेदना आणि तापासाठी)
– कालबद्ध निरीक्षण
– ग्रोमेट्स – ज्या मुलांच्या कानात वारंवार संसर्ग होतो त्यांच्या कानाच्या पडद्यामागे भूल देऊन (त्रास न होता) ग्रोमेट नावाच्या लहान नळ्यांनी द्रव काढून टाकतात.
– वेदना आणि ताप कमी करण्यासाठी पॅरासिटामॉल आणि इबूप्रोफन दिलं जातं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.