Disha Patani | दिशा पाटनीने केली आहे सुप्रसिद्ध चिनी अभिनेता जॅकी चॅन सोबत स्क्रीन शेअर

पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या बोल्डनेसने सर्वांना आश्चर्यचकित करणारी अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) हिने मनोरंजन विश्वामध्ये तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिशाने तिच्या अभिनयाने व अदांनी अनेकांना घायाळ केले आहे. आज यशाच्या शिखरावर असणाऱ्या दिशाने तमिळ चित्रपटांमधून करिअरला सुरुवात केली होती. आता बॉलीवुडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून तिने ओळख निर्माण केली आहे. सुरुवातीला मॉडेलिंग करणारी दिशा (Disha Patani) आता अनेक हिट चित्रपटांमध्ये झळकत आहे.

अभिनेत्री दिशा पाटनी हिचा जन्म 13 जून 1992 रोजी उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये (Pithoragarh, Uttarakhand) झाला आहे. तिचे वडील जगदीश सिंग पाटनी (Jagdish Singh Patani) हे डीएसपी अधिकारी तर आई डॉक्टर आहे. दिशा ही इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असून नोएडा येथील एमिटी यूनिवर्सिटीमध्ये (Amity University, Noida) तिने बी.टेक हे शिक्षण घेतले आहे. मात्र नंतर तिने तिचा मोर्चा मॉडेलिंगकडे वळवला.

2013 साली अभिनेत्री दिशा पाटनी हिने ‘पॉन्ड्स फेमिना मिस इंडिया’ (Pond’s Femina Miss India’) या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि ती फर्स्ट रनर अप ठरली. त्यानंतर दिशाने अनेक मॉडेलिंगची कामे केली तसेच ती मोठ्या पडद्यावर देखील कामे करु लागली. अभिनेत्री दिशा पाटनी हिने तिच्या करिअरची सुरुवात तमिळ चित्रपटापासून केली आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक जगन्नाथ पुरी (Director Jagannath Puri) दिग्दर्शित लोफर (Loafer Movie) या सिनेमामध्ये तिने पहिल्यांदा काम केले. यामध्ये ती अभिनेता वरूण तेजसोबत (Actor Varun Tej) झळकली. अभिनेत्री दिशा पाटनी हिने चिनी चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. सुप्रसिद्ध चिनी अभिनेता जॅकी चॅन सोबत (Jackie Chan) चिनी सिनेमा ‘कुंग फू योगा’मध्ये (Kung Fu Yoga) दिशाने स्क्रीन शेअर केली आहे. मात्र दिशा खरी ओळख ही तिच्या बॉलीवुडच्या पहिल्या चित्रपटाने दिली. तिने ‘एम.एस.धोनी: अनटोल्ड स्टोरी’ (M.S. Dhoni: The Untold Story) मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. दिशाच्या या भूमिकेमुळे तिचा चाहता वर्ग वाढला आणि ती सर्वत्र लोकप्रिय झाली.

अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) हिने अनेक हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
तिचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.
दिशाने आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor) सोबत ‘मलंग’ (Malang) तर अभिनेता टायगर श्रॉफ
(Tiger Shroff) सोबत ‘बाघी 2’ (Baaghi 2) मध्ये स्क्रीन शेअर केली आहे.
तसेच तिने ‘एक व्हिलन रिटर्न’ (Ek Villain Returns), ‘राधे’ (Radhe) या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
अभिनेत्री दिशा पाटनी ही आता अनेक बिग बजेट चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे.
तिचा ‘योद्धा’ (Yodha) व ‘प्रोजेक्ट के’ अर्थात ‘कल्कि 2898-A.D’ (Kalki 2898-A.D) तसेच ‘कंगुवा’ (Kanguva) हे
चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Late MLA Mukta Tilak | आमदार स्व.मुक्ता टिळक यांच्या जयंतीनिमित्त कर्करुग्णांवर मोफत उपचार व तपासणी शिबिराचे 17 व 18 ऑगस्ट रोजी आयोजन

Pune Police News | हडपसर पोलिसांकडून अल्पवयीन मुलांसाठी मार्गदर्शन शिबीर

Jailer Movie | रजनीकांत यांच्या आगामी ‘जेलर’ चित्रपटानिमित्त चेन्नई शहर सजलं; सर्वत्र लागलेत पोस्टर