Jailer Movie | रजनीकांत यांच्या आगामी ‘जेलर’ चित्रपटानिमित्त चेन्नई शहर सजलं; सर्वत्र लागलेत पोस्टर

पोलीसनामा ऑनलाइन – Jailer Movie | दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत (Actor Rajinikanth) यांचा आगामी ‘जेलर’ चित्रपट (Jailer Movie) येत्या 10 ऑगस्टला देशभर प्रदर्शित होणार आहे. अनेक वर्षांनंतर थलायवा रजनीकांत (Thalaiva Rajinikanth) हे पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार आहेत. यामुळे दाक्षिणात्य राज्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. रजनीकांत यांच्या ‘जेलर’ चित्रपटाची सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटामध्ये त्यांनी प्रामाणिक जेलर ‘मुथुवेल’ हे पात्र साकारणार आहे. रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटाची क्रेझ सर्वत्र दिसून येत असून संपूर्ण चेन्नई शहर (Chennai City) हे ‘जेलर’ चित्रपटाच्या पोस्टरने सजले आहे.

दाक्षिणात्य सिनेविश्वामध्ये अभिनेते रजनीकांत यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे. प्रेक्षक देखील थलायवाच्या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतात. ‘जेलर’ या चित्रपटामध्ये अभिनेते रजनीकांत हे जबरदस्त फायटिंग व ॲक्शन सीन करताना दिसणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी देखील अनेक वर्षांनंतर पडद्यावर रजनीकांत यांना ॲक्शनसीन मध्ये पाहता येणार आहे. यामुळे सर्व प्रेक्षक वर्ग उत्सुक असलेला दिसून येत आहे. रजनीकांत यांचा चाहता वर्ग खूप मोठा असून चेन्नईमध्ये त्याचे सर्व रस्त्यावर दर्शन घडत आहे. शहरातील रस्त्या रस्त्यावर जेलर चित्रपटाचे मोठे मोठे बॅनर्स लावलेले दिसून येत आहे. चेन्नईमध्ये एखाद्या उत्सवाप्रमाणे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र ‘जेलर’ चित्रपटाचे पोस्टर झळकत आहे. चेन्नईमधील काही कंपन्यांना ऑफिशियल सुट्टी (Official Holiday For Jailer Movie) देखील जाहीर करण्यात आली आहे.

बहुचर्चित ‘जेलर’ चित्रपट (Jailer Movie) हा एक एक्शन सिनेमा असून यामध्ये हायटेक ड्रामा आणि जबरदस्त फायटिंग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटातील ‘कावाला’ हे गाणे (Kaavaalaa Song) देखील सर्वत्र गाजते आहे. रजनीकांत बरोबरच तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia), शिव राजकुमार (Shiva Rajkumar), सुनील (Sunil) आणि योगी बाबू (Yogi Babu) हे प्रमुख कलाकार भूमिका साकारणार आहेत. अभिनेत्री रम्या कृष्णन (Ramya Krishnan) रजनीकांतच्या बायकोची भूमिका साकारणार आहे ‘रजनी द जेलर’ हा चित्रपट येत्या 10 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस (Jailer Release Date) य़ेणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Bacchu Kadu | ‘…तर मंत्रालयातील सचिव कार्यालयात साप सोडू’, आमदार बच्चू कडूंचा थेट इशारा (व्हिडीओ)

Bhimashankar Temple | भीमाशंकर मंदिर परिसरात मोबाइल वापरास बंदी, मंदिर प्रशासनाचा निर्णय