Pune Police News | हडपसर पोलिसांकडून अल्पवयीन मुलांसाठी मार्गदर्शन शिबीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | अल्पवयीन मुले (Minor) गुन्हेगारीकडे वळू नये यासाठी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) अल्पवयीन मुलांसाठी मार्गदर्शन शिबिराचे (Guidance Camp) बुधवारी (दि.9) आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर ध्यास या सामाजिक संस्थेच्या वतीने घेण्यात आले. चैतन्य सभागृहात झालेल्या या शिबिराला 40 ते 45 मुले उपस्थित होते. (Pune Police News)

ध्यास संस्थेचे विधी सल्लागार (Legal Advisor) विजय बाविस्कर (Vijay Baviskar) व मोहन शेख (Mohan Sheikh) यांनी उपस्थित अल्पवयीन मुलांना व त्यांच्या पालकांना कायदेविषयक बाबी समजावून सांगत मुलांच्या भविष्याबाबत चर्चा केली. तसेच पालकांकडून हमी घेण्यात आली. शिबिरात सहभागी झालेल्या मुलांच्या कौशल्याबाबत चर्चा करुन त्यांना रोजगार निर्मिती बाबत समुपदेशन (Counselling) करण्यात आले. (Pune Police News)

यावेळी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके (Senior PI Ravindra Shelke) यांनी उपस्थित बालक व पालक यांना भविष्यात त्यांच्याकडून कोणत्याही कायदा व सुव्यस्थेचा (Law and Order) प्रश्न निर्माण होणार नाही, तसेच मुले गुन्हेगारी वृत्तीकडे वळू नयेत यासंदर्भात समुपदेशन केले. शिबिरामध्ये हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 40 ते 45 मुले व त्यांच्यासोबत 50 ते 55 पालक उपस्थित होते.

शिबिरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप शिवले (PI Sandeep Shivle),
महिला पोलीस उपनिरीक्षक सुवर्ण गोसावी (PSI Suvarna Gosavi), ध्यास सामाजिक संस्थेचे विजय बाविस्कर
व रीहान शेख यांनी मार्गदर्शन केले. तसेच गोपनीय विभागाकडे अंमलदार शेलार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Bacchu Kadu | ‘…तर मंत्रालयातील सचिव कार्यालयात साप सोडू’, आमदार बच्चू कडूंचा थेट इशारा (व्हिडीओ)

Bhimashankar Temple | भीमाशंकर मंदिर परिसरात मोबाइल वापरास बंदी, मंदिर प्रशासनाचा निर्णय