Disha Patani | ‘त्या’ ड्रेसमुळे अभिनेत्री दिशा पटानीला करावा लागला ट्रोलिंगचा सामना; व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Disha Patani | बॉलीवूड कलाकार नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. हे कलाकार त्यांच्या अभिनयापेक्षा कोणत्या कलाकाराला डेट करत आहेत यावर प्रेक्षक लक्ष देऊन असतात. तर अनेकदा त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांवरून त्यांना ट्रोलही केले जाते. आता अशाच पद्धतीच्या ट्रोलिंगचा सामना अभिनेत्री दिशा पटानीला करावा लागत आहे. अभिनेता टायगर श्रॉफ बरोबर ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्री तिच्या मित्राला डेट करत असल्याची चर्चा सुरू आहे. नुकताच दिशाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. यामध्ये दिशानी परिधान केलेल्या ड्रेसमुळे तिला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. (Disha Patani)

 

दिशा सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव असते. ती तिचे बोल्ड लूक सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते. नुकताच दिशाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यामध्ये दिसत आहे की दिशा एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडत आहे. यावेळी दिशाने लाल ब्रायलेट टॉप आणि डेनिम शॉट परिधान करत हातात पांढरी स्लिंग बॅग आणि हातात पांढऱ्या रंगाची जॅकेट कॅरी केली आहे. या लुक मध्ये दिशा खूपच बोल्ड आणि सेक्सी दिसत आहे. दिशाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, त्यावर आता कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे. दिशाच्या या व्हिडिओवर अनेकांनी हार्ट आणि फायर इमोजी देखील शेअर केले आहेत. (Disha Patani)

 

दिशाचा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी यावर कमेंट करायला सुरुवात केली आहे. त्यातच एका युजरने कमेंट करत म्हटले की, “हिला कोणीतरी चांगले कपडे द्या”. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की “तुमची फिगर दाखवण्यासाठी तुम्हाला नग्न व्हायची काहीच गरज नाही, साधे कपडे घालून देखील तुम्ही तुमची फिगर दाखवू शकतात”. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की “ही महागडी उर्फी आहे”. अशा एक ना अनेक कमेंट सध्या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत. अलीकडेच दिशा पटानी अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहम बरोबर ‘एक विलन 2’ मध्ये दिसली होती. तर आता ती लवकरच ‘योद्धा’ आणि ‘किक 2’ या चित्रपटात झळकणार आहे. दिशाचे अनेक चाहते देखील आहेत. सध्या दिशाच्या या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत.

 

Web Title :- Disha Patani | disha patanis bralet top denim short look trolled by netizenes video viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | शनिवारी परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत होणार महारोजगार मेळावा, विवाह संस्कार मेळावा

Chinchwad Bypoll Election | ‘मला चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत यश पाहिजे’; अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना ठणकावले

Aurangabad Crime | बापाच्या दारू पिण्याच्या सवयीला वैतागून पोटच्या मुलांनीच केली बापाची हत्या