हरियाणा : ‘या’ कर्मचार्‍यांना दिवाळी भेट, सरकारने केली 18000 रुपये फेस्टिवल अ‍ॅडव्हान्स देण्याची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिवाळी 2020 पूर्वी राज्य सरकारने हरियाणाच्या सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारने शासकीय कर्मचार्‍यांसाठी फेस्टिवल अ‍ॅड्वान्सची घोषणा केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा सण आनंदित करण्यासाठी हरियाणा सरकारने ग्रुप-सी आणि ग्रुप -डी मधील नियमित कर्मचाऱ्यांसाठी फेस्टिवल अ‍ॅड्वान्सची घोषणा केली आहे.

या कर्मचार्‍यांसाठी फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स जाहीर
ग्रुप सी आणि ग्रुप डी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स जाहीर केले आहे. ग्रुप सीच्या कर्मचार्‍यांसाठी 18000 रुपये फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स आणि ग्रुप डीसाठी 12000 रुपये फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स सरकारने जाहीर केले आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी हा प्रस्ताव मंजूर करताना दिवाळीपूर्वी कर्मचार्‍यांना मोठी भेट दिली आहे. नोव्हेंबर 2020 च्या पहिल्या आठवड्यात ही आगाऊ रक्कम दिली जाईल असे सरकारने म्हटले आहे.

2 लाखाहून अधिक कर्मचार्‍यांना मिळेल लाभ
सरकारच्या या निर्णयाचा हरियाणाच्या दोन लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. हरियाणामध्ये ग्रुपचे नियमित कर्मचारी 2,29,631 आहेत. या कर्मचार्‍यांच्या फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्ससाठी सरकारने 386.40 कोटी रुपयांचे बजेट पास केले आहे. शासनाने सोप्या हप्त्यात फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स परत करण्याचा पर्याय कर्मचा्यांना दिला आहे. ही रक्कम व्याजमुक्त असेल आणि कामगार ते जास्तीत जास्त 12 हप्त्यांमध्ये परत करू शकतात.

मध्य प्रदेश सरकारने थकबाकीची केली घोषणा
मध्य प्रदेश सरकारने सणांपूर्वी कर्मचार्‍यांच्या थकबाकीची घोषणा करत चांगली बातमी दिली. मध्य प्रदेशच्या शिवराजसिंह चौहान सरकारने सणांच्या दृष्टीने सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकी देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सरकारी कर्मचार्‍यांना दिवाळी भेट दिली आणि सातव्या वेतन आयोगांतर्गत थकबाकीचा तिसरा हप्ता लवकरच दिला जाईल, असे सांगितले.