Face Pack | दररोज फक्त 15 मिनिटे लावा कापूर आणि मुलतानी माती पॅक, चेहरा चमकू लागेल, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Face Pack | मुलतानी माती (multani mitti) वर्षानुवर्षे त्वचेसाठी सर्वोत्तम मानली जाते. त्वचेला मऊ आणि चमकदार करण्यासाठी लोक मुलतानी मातीचा उपयोग बर्‍याच काळापासून करत आहे. कारण ती स्वस्त आहे आणि तिचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. मुलतानी माती (multani mitti) प्रमाणेच कापूर देखील त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कापूरातील अँटिबैक्टीरियल गुणधर्म त्वचा निरोगी बनवतात.

फेसपॅक साठीचे साहित्य

मुलतानी माती – २ चमचे
कापूर – १ तुकडा
गुलाब पाणी – १ चमचा

पद्धत
हे फेसपॅक (Face Pack) तयार करण्यासाठी गुलाबाचे पाणी आणि मुलतानी माती व कापूर बारीक करून त्यात टाका. आता हे सर्व चांगले मिसळा. फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा चांगला स्वच्छ करा. मग हा पॅक संपूर्ण चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून ठेवा. कोरडे झाल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा आणि मॉइश्चरायझर लावा.

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर या पॅकमध्ये गुलाब पाण्याऐवजी नारळतेल किंवा मध वापरा.

पॅक लावण्याचे फायदे

1) खुली छिद्र
हे फेस पॅक लावल्यास चेहऱ्यावरील खुली छिद्र बंद होतील आणि तुमची त्वचा स्वच्छ व सुंदर दिसेल.

2) टॅनिंग
उन्हाळा किंवा हिवाळ्यातील उन्हांमुळे त्वचेवर टॅनिंग होणे सामान्य आहे. हा टॅनिंग काढण्याचा हा सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग आहे.

3) मुरुमांपासून मुक्त व्हा
हा पॅक लावल्याने चेहर्‍यावरील मुरुमांच्या समस्येपासून मुक्तता मिळते.

Web Titel :- diy multani mitti and camphor face pack

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | ‘बाय बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डी’ ! FB पोस्ट टाकत पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाची आत्महत्या

Pune Crime | मुंबईला जाण्यासाठी बस स्टॉपवर झोपलेल्या प्रवाशाचा चोरीच्या उद्देशाने खून; पुणे स्टेशन परिसरातील घटना, प्रचंड खळबळ