DL-RC | ड्रायव्हिंग लायसन्स, RC एक्सपायर झाले असेल तर ‘नो टेंशन’ ! आता 30 सप्टेंबर 2021 पर्यंत राहील व्हॅलिड

नवी दिल्ली : DL-RC | जर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) किंवा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (DL-RC) किंवा फिटनेस सर्टिफिकेट (Fitness Certificate) सह इतर मोटर व्हेईकल डॉक्युमेंट्सची व्हॅलिडिटी संपली असेल तर घाबरण्याची आवश्यकता नाही. तुम्ही या महिन्याच्या अखेरपर्यंत ते रिन्यू करू शकता.

सरकारने आदेश जारी केला होता की, कोरोना महामारीची दुसरी लाट लक्षात घेत सर्व डॉक्यूमेंटस 30 सप्टेंबरपर्यंत मान्य राहतील. अगोदर या सर्व डॉक्यूमेंट्सची वैधता 30 जूनला संपत होती. सरकारच्या या पावलाने कोट्यवधी लोकांना मोठा दिलासा मिळाला.

30 सप्टेंबरपर्यंत व्हॅलिड राहतील ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी

रस्ते आणि परिवहन मंत्रालयाकडून जारी आदेशानुसार, हे डॉक्यूमेंट्स जे 1 फेब्रुवारी 2020 ला एक्सपायर होणार होते आणि लॉकडाऊनच्या प्रतिबंधामुळे रिन्यू होऊ शकत नव्हते, आता ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वैध मानले जातील. मंत्रालयाकडून सर्व संबंधित विभागांबाबत आदेश जारी केला आहे.

त्यांना सांगण्यात आले आहे की, यातून नागरिकांना ट्रान्सपोर्ट संबंधित सेवांमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण
येऊ नये. सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना सांगण्यात आले आहे की, त्यांनी ताबडतोब प्रभावाने आदेश
लागू करावेत, जेणेकरून ट्रान्सपोर्ट आणि दुसर्‍या संस्था ज्या कठिण काळात काम करत आहेत त्यांना
कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागू नये.

हे देखील वाचा

Pune Corporation |  पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन घेण्याचे प्रधान सचिवांचे पालिका आयुक्तांना आदेश

Corporator Dheeraj Ghate | महापालिका निवडणुकीचा मार्ग ‘साफ’ करण्यासाठी धीरज घाटे यांच्यावर हल्ल्याचा ‘कट’; एका राजकीय पक्षाच्या तिघांच्या अटकेने शहरात खळबळ, जाणून घ्या ‘अंदर की बात’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  DL-RC | driving license and registration certificate validity extend to september 30 2021 here is the details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update