Pune Corporation |  पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन घेण्याचे प्रधान सचिवांचे पालिका आयुक्तांना आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेची (Pune Corporation)सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. मात्र, आता कोरोना (Corona) बाधित रुग्णांची संख्या घटल्याने ही सभा ऑफलाईन पद्धतीने घेण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. यासंदर्भात आपत्ती व्यवस्थान, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता (Asim Gupta) यांनी पुणे महापालिका आयुक्तांना (Municipal Commissioner) सर्वसाधारण सभा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP)  शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी पालिकेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन पद्धतीने घेण्याची मागणी पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे केली होती.

आपत्ती व्यवस्थापन, मुदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी आदेश काढून सर्वसाधारण सभा ऑफलाईन घेण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश जारी करताना त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सभागृहामध्ये उपलब्ध आसन क्षमतेच्या  50 आसन क्षमतेचा वापर करण्यास सांगितले आहे. याशिवाय कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे महानगरपालिकेतील सर्व सभासदांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे महानगरपालिकेची मुख्यसभा ऑफलाईन पध्द्तीने घेण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. पुणेकरांचे प्रश्न समस्या प्रखरतेने सभागृहात मांडण्यासाठी ऑफलाईन सभा होणे खूप महत्वाचे होते. त्यामुळे याबाबत महापौर यांना सुद्धा विनंती केली होती. यासंबंधीचे महापौर यांचे विनंती पत्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यांना पाठवण्यात आले होते. सोमवार (दि.7) सायंकाळी या संबंधी ऑफलाईन मुख्यसभा घेण्याबाबतच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांनी (CM) स्वाक्षरी केली असल्याची माहिती प्रशांत  जगताप यांनी दिली.

नगरसेवकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले.

ऑफलाइन जीबीचे शासनाचे आदेश महापालिकेला मिळाल्यानंतर सभागृह नेते गणेश बिडकर (Ganesh
Bidkar) म्हणाले, राज्य सरकारने ऑफलाईन पद्धतीने सर्वसाधारण सभा घेण्यास मान्यता दिल्याने
नगरसेवकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. अनेक दिवसांची प्रतीक्षा या आदेशामुळे संपली आहे.

हे देखील वाचा

Pune Crime | भाजपचे नगरसेवक धिरज घाटे यांच्या हत्येचा कट; एका राजकीय पक्षाशी संबंधित तिघांवर गुन्हा, पोलिसांनी घेतले ताब्यात

Rajesh Tope | महाराष्ट्रातील निर्बंध कधीपासून कडक होणार? राजेश टोपे म्हणाले…

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Corporation | Principal Secretary orders Municipal Commissioner to hold general meeting of Pune Municipal Corporation offline

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update