जगात सर्वात जास्त वापरल्या जातात ‘या’ 5 टॉप ‘वेबसाइट’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज जगभरात स्मार्टफोन धारकांची संख्या वेगाने वाढत असल्याने इंटरनेटचा वापर देखील वाढला आहे. यात सर्च करताना यूजर्स सर्वात जास्त कोणत्या ब्राऊजरचा वापर करतात हे तुम्हाला माहित आहे. जगभरातील 5 टॉप वेबसाइट अशा आहेत ज्यावर सर्वात जास्त सर्फिंग होते.

1. Google –
google

जगभरात सर्वात उत्तम आणि वेगवान चालणारी वेबसाइट म्हणजे Google.com या वेबसाइटचा यूजर्स सर्वात अधिक वापर करतात. जून 2019 च्या जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार या वेबसाइटला महिन्याला तब्बल 6049 अब्ज लोक भेट देतात. सर्च इंजिन म्हणून ही सर्वात जास्त वापरली जाणारी वेबसाइट आहे.

2. Youtube –
You-Tube

जगभरात व्हिडिओ सर्फिंगसाठी सर्वात प्रसिद्ध वेबसाइट म्हणजे youtube यूट्यूब गुगलच्याच मालकीचे आहे. यावर तुम्हाला हवे असलेले सर्व काही सहज उपलब्ध होते. या वेबासाइटला महिन्याला 24.31 अब्ज लोक भेट देतात.

3. Facebook –
Facebook

सोशल मिडियामध्ये सर्वात अव्वल स्थानी असलेले वेबसाइट म्हणजे फेसबूक. यूजर्सकडून याचा होणारा वापर हा इतर सोशल मिडिया पेक्षा कितीतरी पट जास्त आहे. फेसबूक वापरणाऱ्यांची संख्या 19.98 अब्ज इतकी आहे.

4. Baidu –
Baidu
चीनी कंपनीची असलेली ही वेबसाइट वापरणाऱ्यांची संख्या 9.77 अब्ज आहे, चीनमध्ये गुगलवर निर्बंध असल्याने तेथे सर्वात जास्त या वेबसाइटचा वापर केला जातो. अनेक मोठ मोठ्या कंपन्यांना मागे टाकत ही कंपनी अव्वल स्थान गाठण्याचा प्रयत्न करत आहे. जगातील अन्य दिग्गज कंपन्यांना आणि वेबसाईट्सना मागे टाकत चीनमधील सर्च इंजिन असलेल्या baidu.com या यादीत चौथे स्थान मिळवले आहे. या वेबसाईटला 9.77 अब्ज लोक भेट देतात.

5. wikipedia –
Wikipedia

सर्वांना मोफत ज्ञान मिळावे या उद्देशाने सुरु झालेली वेबसाइट wikipedia आता 5 क्रमांकवर आहे. यावरुन सर्व काही माहिती कोणालाही मिळू शकते, आणि कोणीही त्यात नव्या ज्ञानाचे भर घालू शकते. या वेबसाइटला महिन्याला 4.69 अब्ज लोक भेट देतात.

आरोग्यविषयक वृत्त –