‘या’ कारणाने प्रवीण कुमारने घेतली निवृत्ती 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा माजी गोलंदाज प्रविण कुमारने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारत असल्याचं जाहीर केलं आहे. २००७ साली जयपूर येथे पाकिस्तानविरुद्ध वन-डे सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रविण कुमारने नवीन गोलंदाजांना संधी मिळावी म्हणून  निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी त्याने ट्विटरवर  माहिती दिली आहे.
प्रवीण कुमार यापुढे कंपनीमधून क्रिकेट खेळणार आहे तसेच  भविष्यात त्याला आपण प्रशिक्षक व्हावं, अशी इच्छा आहे.
भारतासाठी तब्बल १३ वर्षे प्रवीण कुमार क्रिकेट खेळला. पण सध्याच्या घडीला त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळत नसल्याने त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. महेंद्रसिंग धोनी कर्णधार असताना प्रवीण कुमार हा भारताचा मुख्य गोलंदाज होता. पण गेल्या काही वर्षांमध्ये मात्र त्याला भारतीय संघात संधी मिळालेली नव्हती.
२००५-०६ साली रणजी क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशकडून पदार्पण करणाऱ्या उमेश यादवने २००७ मध्ये भारतीय संघात स्थान मिळवलं.
चेंडू स्विंग करण्यात पटाईत असलेल्या प्रविण कुमारने अल्पावधीतच टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज म्हणून नाव कमावलं. मात्र वन-डे क्रिकेटप्रमाणे कसोटी क्रिकेटमधले त्याला फारशी संधी मिळाली नाही. प्रविण कुमारने ६ कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं ज्यात त्याने २७ बळी घेतले.
निवृत्तीबाबत प्रवीण म्हणाला की, ” मी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारण्याचं ठरवलं आहे. हा निर्णय मी घाईत घेत नाहीये, यावर मी खूप विचार केला आणि निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ असल्याचं मला जाणवलं. मला संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआय, उत्तर प्रदेश क्रिकेट संघटना व राजीव शुक्ला यांचा कायम आभारी असेन. मी निवृत्ती घेतली असली तरी त्याबाबत मला शल्य नाही. कारण मी मनापासून क्रिकेट खेळलो. खेळाशी प्रतारण मी कधीही केली नाही. बरेच युवा गोलंदाज तयार होत आहेत. त्यांना संधी मिळावी, म्हणून मी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. “