RT-PCR टेस्ट निगेटिव्ह आली तरी असू शकतो ‘कोरोना’, डॉक्टरांनी दिला हा महत्वाचा सल्ला, जाणून घ्या

अहमदाबाद : वृत्तसंस्था –   देशात कोरोना वेगाने वाढत असताना कोरोना चाचणीनंतर सुद्धा संक्रमित असल्याचा शोध घेणे या नव्या लाटेत त्रासदायक ठरत आहे, कारण संसर्गाच्या तपासणीसाठी वापरण्यात येणार्‍या आरटी-पीसीआर टेस्टमध्ये सुद्धा तो सापडत नसल्याचे दिसून येत आहे.

माहितीनुसार, आरटी-पीसीआर टेस्टमध्ये जवळपास 80 टक्के केसमध्ये कोरोना सापडतो, अशावेळी डॉक्टरांचे म्हणणे आहे की टेस्ट झाल्यानंतर 24 तासानंतरच जर सीटी स्कॅन टेस्ट केली गेली तर खरा रिपोर्ट मिळू शकतो. गुजरातसह देशाच्या अनेक राज्यात असे दिसून येत आहे. येथे आरटी-पीसीआरमध्ये रिपोर्ट निगेटिव्ह आहे, परंतु तरीसुद्धा लोक कोरोना व्हायरसने संक्रमित आढळत आहेत. गुजरातमध्ये डॉक्टर आरटी-पीसीआरद्वारे टेस्ट करतात, परंतु हाय रिझोल्यूशन सीटी स्कॅनमध्ये रूग्णांच्या फफ्फुसात कोविडासारखा संसर्ग सापडल्याचा खुलासा केला आहे. जर फफ्फुसात लाईट ग्रीन किंवा ब्राऊन कलरचे पॅच दिसत असतील तर हे कोरोनाचे लक्षण आहे.

वडोदराच्या प्रायव्हेट हॉस्पिटल्सची एक संघटना एसईटीयूचे चेयरमन डॉ. कृतेश शाह यांनी सांगितले की, मी आरटी-पीसीआरमध्ये निगेटिव टेस्ट आलेल्या रूग्णांना घेऊन आलो, त्यांच्या रेडियोलॉजिकल टेस्टिंगमधून समजले की, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची आवश्यकता आहे. सीटी स्कॅनमध्ये एका रूग्णांचा स्कोअर 25 पैकी 10 आहे. याचा अर्थ असा आहे की, त्याची फफ्फुसे अगोदरच प्रभावित झाली आहेत. तर संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. हितेन करलिया यांचे म्हणणे आहे की, आम्ही अनेक प्रकरणात पहात आहोत की, रूग्णाला कोणतेही लक्षण नाही किंवा केवळ हलका ताप आणि कमजोरी आहे, परंतु संसर्ग वेगाने फफ्फुसात पसरतो.

नंद हॉस्पिटलचे एमडी डॉ. नीरज चावडा यांनी सांगितले की, आरटी-पीसीआरची संवेदनशीलता 70% आहे, ज्यातून स्पष्ट होते की, निगेटिव्ह रिपोर्टमध्ये सुद्धा 30 टक्के पॉझिटिव्ह असण्याची शक्यता आहे.