पुण्यातील नामांकित हाॅस्पिटलमध्ये डाॅक्टरची आत्महत्या

णे : पोलीसनामा आॅनलाईन

पुण्यातील नामांकित हाॅस्पिटलपैकी एक असलेल्या पूना हाॅस्पिटलमध्ये एका डाॅक्टरने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकांत बम (वय ६३ वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या डाॅक्टरांचे नाव आहे. गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. डाॅ शशिकांत यांच्याजवळ एक सुसाईड नोटही सापडली आहे. परंतु त्यांच्या आत्महत्येसाठी कोणीही जबाबदार नसल्याचं त्यात सांगण्यात आलं आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’14af7877-cae7-11e8-917e-f56310b61a27′]

डाॅ. शशिकांत बंब यांच्या आत्महत्येमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. आज सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली आहे. डाॅ. बंब यांच्या आत्महत्येमुळे हाॅस्पिटल प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे. डाॅ. बंब यांच्याजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे की, ‘माझ्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरु नये. मी निराश होऊन आत्महत्या करत आहे, ज्याला मी स्वत: च जबाबदार आहे.
[amazon_link asins=’B0796QP4LS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1d963743-cae7-11e8-8c35-b9368c5e66eb’][amazon_link asins=’B0796QP4LS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’25d4d005-cae7-11e8-b479-3d4bcc820d67′]

डाॅ. शशिकांत बंब हे डेटिंस्ट म्हणून पूना हाॅस्पिटलमध्ये कार्यरत होते. सकाळी ते हाॅस्पिटलमध्ये आल्यानंतर थेट रेस्ट रुममध्ये गेले. सर्वांना वाटले की, ते आराम करत असावेत. सकाळी 9.30 वाजता स्वच्छता करणाऱ्या मावशी गेल्यावर त्यांना गळफास लावलेला डाॅक्टरांचा मृतदेह आढळला. डाॅ बंब यांच्या अचानक आत्महत्येमुळे त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का पोचला आहे. सकाळी 5.30 वाजता ते दवाखाण्यात असल्याची माहिती बायोमेट्रीक मशीनच्या माध्यमातून मिळाली आहे.

ब्रेक फेल झालेल्या ट्रकने अनेकांना चिरडले : 8 जण जखमी
पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या आयएसआय एजंटला नागपुरात अटक