Dombivli Crime | धक्कादायक ! घरातील सोफासेटमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, परिसरात प्रचंड खळबळ

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाइन – डोंबिवली शहरामध्ये (Dombivli Crime) काळजाचा थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. डोंबिवली (Dombivli Crime) पूर्व भागातील दावडी (Davadi) येथे एका महिलेचा निर्घृण खून (Murder in Dombivli) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर खून करुन त्या महिलेचा मृतदेह (Dead Body) तिच्याच घरातील सोफ्यात (Sofa) लपवून ठेवल्याचे आढळून आले आहे. महिलाचा गळा दाबून खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परंतु हा धक्कादायक प्रकार कोणी केला ? हे समजू शकले नाही. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात (Manpada Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

सुप्रिया किशोर शिंदे (Supriya Kishor Shinde) असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेकडील (Dombivli Crime) दावडी येथील शिवशक्ती नगर (Shivshakti Nagar) परिसरात शिंदे कुटुंब वास्तव्यास आहे. पती किशोर हे कामावर गेले होते तर मुलगाही शाळेत गेल्याने सुप्रिया घरामध्ये एकट्याच होत्या. सुप्रिया मुलाला शाळेत आणण्यासाठी गेली नसल्याने फोन सुरु झाले. शेजाऱ्यांकडे ठेवण्यात आलेल्या चावीने दरवाजा उघडण्यात आला. मात्र, सुप्रिया आढळून आली नाही. दरम्यान तिचे पती किशोर हे संध्याकाळी उशीरा घरी पोहचले. पत्नीचा काही ठावठिकाणा लागत नसल्याने त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली.

दरम्यान काही शेजारी आणि नातेवाईक घरात आले. शेजाऱ्यांना सोफा विस्कटलेला दिसून आला आणि तो सोफा चाचपला. त्यावेळी त्यांना धक्का बसला. कारण सुप्रियाचा मृतदेह सोफ्यात कोंबून ठेवला होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बगाडे (Senior Police Inspector Shekhar Bagade), पोलीस निरीक्षक अनिल पडवळ (Police Inspector Anil Padwal) आणि पोलीस अधिकारी अविनाश वनवे (Police Officer Avinash Vanve) यांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र सुप्रिया यांचा कोणी व कशासाठी खून केला ? त्यांच्यासोबत काही गैरप्रकार झाला आहे का ? याचा तपास पोलीस करीत आहे. या प्रकरणात काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु करण्यात आली आहे.

 

Web Title :- Dombivli Crime | woaman body was found on the sofa set in the house dombivli crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा